मुलींना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:53+5:302021-07-14T04:11:53+5:30
रामटेक : मुलींना स्वत:चे संरक्षण स्वत: करता यावे, यासाठी मनसर (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. ११) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात ...
रामटेक : मुलींना स्वत:चे संरक्षण स्वत: करता यावे, यासाठी मनसर (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. ११) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात मुली व तरुणांना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयाेजन गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मनसरच्या वतीने शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानांतर्गत करण्यात आले हाेते. यात मुलींना स्वत:चे संरक्षण स्वत: कसे करावे, कशा पद्धतीने सक्षम बनावे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, मुलींना या अकॅडमीच्या माध्यमातून स्वसंरक्षणासाठी कराटे, वुशू, थाई बॉक्सिंग, आष्टे डू आखाडा आणि तावलू या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घाेषणाही करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, सल्लागार अजय खेडगरकर, अर्चना पेटकर, सुशांत कारेमोरे, पवन बाजनघाटे, वैशाली पगाडे, सीमा कडवे, माधवी पटेल यांच्यासह तरुणी व नागरिक उपस्थित हाेते.