गुंठेवारीचा दोन लाख भूखंडधारकांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:08 AM2021-01-17T04:08:16+5:302021-01-17T04:08:16+5:30
गुंठेवारी विभाग नासुप्रकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे यासाठी सक्षम यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ...
गुंठेवारी विभाग नासुप्रकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे यासाठी सक्षम यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत शासननिर्णयाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेने सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
.......
यंत्रणा व नागरिकही गंभीर नाही
गुंठेवारी योजना शासकीय यंत्रणेकडून गांभीर्याने राबविण्यात आलेली नाही. त्याचबरोबर गुंठेवारी घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही अनियमित, बेकायदा घरे नियमित करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. शहरालगतच्या भागातही अशीच परिस्थिती आहे. शहर व ग्रामीण भागाचा विचार करता दोन लाखांवर भूखंडधारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
.....
गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया
- गुंठेवारी नियमितीकरणासाठीचा प्रस्ताव घरमालकाने महापालिकेकडे दाखल करावा.
- प्रस्तावासोबत अस्तित्वातील बांधकामाचा नकाशा जोडून आवश्यक शुल्क भरावे.
- त्यानंतर महापालिका नियमितीकरणाचे प्रमाणपत्र देते.
- नियमितीकरण प्रमाणपत्रानंतर घराचा सात-बारा उतारा, सिटी सर्व्हेला नोंद करण्यासाठी महसूल खात्याकडे अर्ज करावा.
- त्यानंतर नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते.
..........
नियमित झाल्यावर फायदे
- घराला कायदेशीर मालकीहक्काचे स्वरूप मिळते.
- घर विकता येते.
- वारसाच्या नावे करता येते.
- त्यावर कर्ज काढता येते.