गुप्ता हॉस्पिटलला ३० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:35+5:302021-03-21T04:08:35+5:30
बायोमेडिकल वेस्ट प्रकरणात कारवाई : १५ प्रतिष्ठानांना १.३५ लाखांचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बायोमेडिकल वेस्टची योग्य ...
बायोमेडिकल वेस्ट प्रकरणात कारवाई : १५ प्रतिष्ठानांना १.३५ लाखांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बायोमेडिकल वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने, पंचशील चौकातील गुप्ता हॉस्पिटलला मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) शनिवारी ३० हजाराचा दंड ठोठावला. हॉस्पिटलने बायो वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता ते कचऱ्यात टाकल्याचे आढळून आल्याने हा दंड आकारण्यात आला. धरपेठ झानेच्या पथकाने कारवाई करून हा दंड वसूल केला. एनडीएसच्या पथकांनी ५७ प्रतिष्ठान, कार्यालयांची तपासणी केली. १५ जणांवर कारवाई करून १ लाख ३५ हजारांचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत पंचशील चौकातील गुप्ता हॉस्पिटलसह तीन प्रतिष्ठानावर कारवाई करून ४० हजार दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने ५ प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोली झोनच्या पथकाने ७ प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार दंड वसूल केला. नेहरूनगर झोनच्या पथकाने ७ प्रतिष्ठानांची तर गांधीबाग झोनच्या पथकाने ४ प्रतिष्ठांनाची तपासणी केली. सतरंजीपुरा झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. लकडगंजच्या पथाकाने ९ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार तर आशीतगर झोनच्या पथकाने ८ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.