गुरूकुलनगर, परसाेडा भागात माकडांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:23+5:302021-01-25T04:09:23+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गुरुकुलनगर, शिवनगर व परसाेडा भागात सध्या माकडांच्या कळपांनी उच्छाद मांडला ...

Gurukulnagar, Monkeys in Parsada area | गुरूकुलनगर, परसाेडा भागात माकडांचा उच्छाद

गुरूकुलनगर, परसाेडा भागात माकडांचा उच्छाद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शीतलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गुरुकुलनगर, शिवनगर व परसाेडा भागात सध्या माकडांच्या कळपांनी उच्छाद मांडला आहे. या माकडांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने माकडांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रामटेक शहरालगत असलेल्या गुरुकुलनगर, शिवनगर, परसाेडा भागात ३० ते ४० माकडांचा कळप दरराेज धुमाकूळ घालत आहे. माेठी माकडे घरात शिरतात. स्वयंपाक करणाऱ्या महिलांना अक्षरश: ते घरातून पळवून लावतात. माकडांना हाकलायला गेल्यास ती अंगावर धावून येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. विशेषत: लहान मुले व महिला भयभीत झाल्या आहेत. घराच्या अंगणातील बाग, झाडे ही माकडे उद्ध्वस्त करतात तसेच काैलारू घरे व टिनपत्र्यावर उड्या मारत असल्याने नागरिकांचे नुकसान हाेत आहे.

काही माकडे राेगग्रस्त असून, अनेकांच्या शेपट्या गायब आहेत. काही माकडांचे हात गळाले आहेत, शिवाय अनेकांना त्वचा राेग झालेला दिसून येताे. त्यामुळे ही अस्वस्थ माकडे आक्रमक झाली असल्याची नागरिकांची ओरड आहे. काही दिवसांपूर्वी या माकडांना पकडण्याची माेहीम सुरू करण्यात आली होती. त्यास काहींनी विराेध दर्शविला. गडमंदिर परिसरातील ही माकडे रामटेकची शान आहेत. परंतु, ती त्रासदायक ठरत असतील, तर त्यांना पकडून जंगलात साेडणे आवश्यक झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका माकडाने अनेकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या. त्यावेळी वनविभागाने माकडांना पकडून जंगलात साेडल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला. आता परसाेडा येथील गुरूकुलनगर, शिवनगरात या माकडांनी माेर्चा वळविला आहे. वनविभागाने या माकडांचा तात्काळ बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

Web Title: Gurukulnagar, Monkeys in Parsada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.