भरदुपारी मेघांनी दाटले नभ, सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:01 PM2023-05-29T16:01:35+5:302023-05-29T16:05:20+5:30
वातावरणात गारवा, नागरिकांना दिलासा
नागपूर : सकाळपासूनच्या कडक उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असताना अचानक दुपारी ३ नंतर आकाशात ढग दाटून आले व सोसाट्याचा वारा सुटला. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची त्रोधातिरपीट उडाली.
गेल्या काही दिवसांपासून उन पावसाचा खेळ सुरू आहे. तळपतं उन अन जोरदार पाऊस असा वातावरण बदलाचा लपंडाव सुरू आहे. यातच आज दिवसभर तापलेल्या उन्हानंतर दुपारी जोरदार वारा सुटून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींना सुरुवात झाली. वादळ-वारा-ढगांचा गडगडाट अन पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची अचनाक तारांबळ उडाली.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व पवनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तर काही ठिकाणी गारपिट झाली. यामुळे शहरांसह ग्रामीण भागात एकच धावपळ उडाली. यामुळे शेतशिवारात कापून ठेवलेल्या उन्हाळी धानाच्या कळपा पाण्यात भिजल्या. त्यामुळे पाखर धान होण्याची शक्यता आहे. उभे धान जमिनीवर लोळल्याने कापणीचा खर्च वाढणार आहे. उन्हाळी मूंग व उळीद व अन्य भाजीपाला पीक यांचेही गारपिटीने नुकसान झाले.