‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:57 AM2017-09-26T00:57:53+5:302017-09-26T00:59:47+5:30

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे.

Gwalbanshi on 'ED' radar | ‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

googlenewsNext
ठळक मुद्देदिलीप ग्वालबन्शीविरुद्ध होणार मनी लाँड्रिंगची कारवाईविशेष पथकाने दाखल केली ३४ प्रकरणे, ४४ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे. ग्वालबन्शी आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेली नागपूर जिल्ह्यातील ९८.३३ एकर जमीन महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) जप्त करण्यात आलेली आहे.
दिलीप ग्वालबन्शी आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आलेली आहे. एसआयटीने दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध १३ प्रकरणे दाखल केलेली आहेत. दिलीप, त्याचे साथीदार ईश्वर सुप्रेटकर, अंथोनी ऊर्फ जॉन स्वामी, प्रेम यादव, पप्पू ऊर्फ राहुल यादव यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून प्रेमव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
मोक्काच्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी दिलीप ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी यांनी गुन्हेगारीच्या माध्यमातून जमवलेल्या संपत्तीची माहिती प्राप्त केली. त्या आधारावर दिलीपच्या नावे ६५.३३ आणि शुभांगीच्या नावे ३३.०३ एकर जमीन असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या मालमत्ता पिपळा रिठी, तारसा, मौदा, गोरेवाडा, कामठीच्या खैरी, हजारी पहाड, कळमेश्वर, येरला आणि गिट्टीखदानच्या बोरगाव भागातील आहेत.
पोलिसांनी या संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का विशेष न्यायालयात निवेदन सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने जप्तीची अनुमती दिली. मोक्काअंतर्गत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीप ग्वालबन्शी व पत्नीच्या संपत्तीबाबतची सूचना प्रवर्तन निदेशालय आणि आयकर विभागाला दिल्याचे सांगितले.
ही संपत्ती अवैध मार्गाने प्राप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडी ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करणार आहे. दिलीप ग्वालबन्शीच्या पत्नीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.
९९९ तक्रारींची सुरू आहे चौकशी
पत्रकारांशी बोलताना कदम यांनी सांगितले की, एसआयटीने आतापर्यंत ३४ प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्यात १५० जणांना आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. ६५८ पीडितांना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आलेला आहे. ५२२ तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला असून ९९९ तक्रारींची चौकशी सुरू आहे. मात्र एसआयटीचे कामकाज गुंडाळले जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

Web Title: Gwalbanshi on 'ED' radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.