१२ नोव्हेंबर रोजी हबीबगंज-चेन्नई विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:42 AM2019-11-08T10:42:26+5:302019-11-08T10:42:47+5:30
मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता हबीबगंज ते चेन्नई सेंट्रलकरिता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला असून ही रेल्वे नागपूरमार्गे जाणार आहे. या रेल्वेची एकच फेरी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता हबीबगंज ते चेन्नई सेंट्रलकरिता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला असून ही रेल्वे नागपूरमार्गे जाणार आहे. या रेल्वेची एकच फेरी होणार आहे.
ही रेल्वे (०१६५४) हबीबगंज येथून १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.२५ वाजता प्रस्थान करून इटारसी येथे दुपारी १२ वाजता, आमला येथे दुपारी २.१३ वाजता, नागपूर येथे दुपारी ४.४५ वाजता, सेवाग्राम येथे सायंकाळी ५.५४ वाजता, चंद्रपूर येथे सायंकाळी ७.१२ वाजता, बल्लारशाह येथे सायंकाळी ७.५० वाजता, सिरपूर कागजनगर येथे रात्री ८.३९ वाजता, रामगुंडम येथे रात्री ९.३९ वाजता, वारंगल येथे रात्री ११.१८ वाजता, खम्मम येथे मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता, विजयवाडा येथे पहाटे २.३५ वाजता, ओंगल येथे पहाटे ४.२४ वाजता, नेल्लोर येथे सकाळी ५.३९ वाजता, गुडुर जंक्शन येथे सकाळी ६.५८ वाजता, सुल्लुरुपेटा येथे सकाळी ७.३९ वाजता तर, चेन्नई सेंट्रल येथे सकाळी १०.१० वाजता पोहोचेल. या रेल्वेला एकूण १८ डब्बे राहणार असून त्यातील ३ तृतीय श्रेणी वातानुकुलित, ४ शयनयान, ८ सामान्य तर, ३ एसएलआर डब्बे राहणार आहेत.