अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले

By दयानंद पाईकराव | Published: June 27, 2023 06:54 PM2023-06-27T18:54:55+5:302023-06-27T18:55:17+5:30

Nagpur News नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

had intercourse with a minor girl; As soon as the subject of marriage was brought up, he drifted away | अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले

अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले

googlenewsNext

दयानंद पाईकराव 

नागपूर : नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. जरीपटका ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपाली भगत यांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

तुषार प्रभाकर मेश्राम (वय २६, रा. सिद्धार्थनगर टेका पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी कल्याणीची (बदललेले नाव) ८ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या मोठ्या आईकडे आरोपी तुषारसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी तुषार ट्रेडिंग क्लासेसला शिकत आहे. तर कल्याणी बीबीसीएच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. आरोपीसोबत ओळख झाली तेंव्हा तिचे वय १६ वर्ष होते. आरोपीने ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

चार वर्ष त्याने तिचे शारिरीक शोषण केले. परंतु कल्याणीने लग्नाचा विषय काढला असता आरोपीने टाळाटाळ केली व शेवटी लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच कल्याणीने जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), (एन), सहकलम ४, ६ पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. तपास उपनिरीक्षक रुपाली भगत करीत आहेत.

Web Title: had intercourse with a minor girl; As soon as the subject of marriage was brought up, he drifted away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.