शहरात चोरट्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:17+5:302021-02-27T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. मानकापूर, कपिलनगर आणि अजनी परिसरात चोरट्यांनी चोरी, ...

Hados of thieves in the city | शहरात चोरट्यांचा हैदोस

शहरात चोरट्यांचा हैदोस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. मानकापूर, कपिलनगर आणि अजनी परिसरात चोरट्यांनी चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. गुरुवारी एकाच दिवशी या प्रकरणाच्या पोलिसांकडे तक्रारी पोहचल्या. मानकापूरच्या मेहबूबमिया मशिदीजवळ राहणारे नाजिम अली नईम अली (वय ४५)हे १९ ते २४ फेब्रुवारीदरम्यान सहपरिवार मुंबईला गेले होते. चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून आतमधून रोख २०हजार, सोन्याचे दागिने आणि हातघड्याळासह १ लाख, ५९ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नाजिम अली यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

कपिलनगरातील चैतन्यनगर, भारत गॅस गोदामाजवळ राहणारे रोमिल पुरुषोत्तम तोतडे यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान तोतडे सहपरिवार हैदराबाद येथे होते. त्यावेळी चोरट्यांनी हा डाव साधला. कपिलनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

कपिलनगरातच खसाळा येथे गुरुवारी दुपारी २.४० च्या सुमारास चोरीची घटना घडली. संतोषकुमार गुलाबचंद पांडे (वय ४५) यांच्या दुकानात दोन आरोपी टायर घ्यायला आले. पांडे यांची मुलगी यावेळी दुकानात होती. ती टायर आणण्यासाठी दुसऱ्या रुममध्ये गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाच्या काउंटरमधील २४२० आणि बाजुला ठेवलेल्या बॅगमधील ५० हजार रुपये चोरून नेले.

चोरीची आणखी एक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घडली. संजना दत्तात्रेय बेंगलुकर (वय ५५)या १२ ते२५ फेब्रुवारीदरम्यान त्यांच्या कोपरी ठाणे येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांनी गुरुवारी आपल्या बॅगची तपासणी केली असता त्यातील ६ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अजनी ठाण्यात या चोरीची तक्रार नोंदवली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

----

Web Title: Hados of thieves in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.