रात्री वाढला गारठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:40+5:302020-12-06T04:09:40+5:30
नागपूर : शहरात सूर्यास्तानंतर गारठा वाढत असल्याने थंड हवा वाहत आहे. पारा सामान्यपेक्षा एक अंशाने खाली घसरला असून १२.४ ...
नागपूर : शहरात सूर्यास्तानंतर गारठा वाढत असल्याने थंड हवा वाहत आहे. पारा सामान्यपेक्षा एक अंशाने खाली घसरला असून १२.४ डिग्री सेल्सियस नाेंद करण्यात आली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी तापमानात ०.३ अंशाची सामान्य वृद्धी दर्शविण्यात आली. मात्र गारव्यात कमतरता आली नाही. रात्री १० नंतर हुडहुडीसह थंडीचा प्रभाव जाणवायला लागला आहे. शनिवारीही १०.५ अंश किमान तापमानासह गाेंदिया सर्वात गार ठरला.
हवामान विभागानुसार वातावरणात काेरडेपणा कायम आहे. उत्तर भारताकडील थंडी हवा मध्य भारताकडे वाहत नसल्याने तापमानात वेगाने घसरण दिसून येत नाही. कमी दाबाचे क्षेत्र कमी हाेताच तापमानातही कमतरता येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डिसेंबरचा पहिला आठवडा सुरू हाेताच दिवसा तापमानात घसरण हाेत आहे. मात्र वर्तमानात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा दाेन डिग्री अधिक ३१.७ अंश नाेंदविण्यात आले आहे. यामुळे सकाळच्यावेळी थंडीचा प्रभाव जाणवत नाही.