नागपुरात गारा, पाऊस आणि थंडीची महाआघाडी; विदर्भात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 09:47 AM2020-01-02T09:47:11+5:302020-01-02T09:48:05+5:30
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. कापूस, तूर, चणा ही पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह विदर्भातील यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात अखंड वृष्टी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबाजार येथे सगळा कापूस ओला झाला आहे. बिजोरा भागात पडलेल्या गारांमुळे शेतीचे अनोतान नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथे तूर, चना व कापूस ही पिके आडवी झाली आहेत. मोठ्या बोराएवढ्या आकाराच्या गारांनी अनेक घरांची कौले फोडली तर शेतीचे नासधूस केली आहे. हा पाऊस दिवसभर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.