महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे केशशिल्प प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:50+5:302020-12-22T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा कौशल्य विकास समितीच्या वतीने एक दिवसीय केशशिल्प प्रशिक्षण शिबिर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा कौशल्य विकास समितीच्या वतीने एक दिवसीय केशशिल्प प्रशिक्षण शिबिर संत नगाजी महाराज सांस्कृतिक भवनात सोमवारी पार पडले. शिबिराचे उद्घाटन आ. मोहन मते यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र केशशिल्प मंडळाचे अध्यक्ष बंडूभाऊ राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, नागपूर जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी यांच्या उपस्थितीत झाले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सलून प्रशिक्षक धरम अतकरे आणि सहायक प्रशिक्षिका पूजा अतकरे, सहायक दर्शन ठमके यांनी उपस्थितीत शिबिरार्थी सलून व्यावसायिकांना केशरचनेचे नवीन तंत्र, व्यवसायविकास आदीबद्दल प्रशिक्षण दिले. दोन सत्रात झालेल्या या शिबिरात ‘कोरोनानंतरचा सलून व्यवसाय’या विषयावर धरम अतकरे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय सत्र प्रा. वसंतराव चिंचाळकर यांच्या उपस्थितीत झाले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन समारोप करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ कौशल्य विकास समितीतर्फे राजेंद्र फुलबांधे, विनेश कावळे, राजू चिंचाळकर, योगेश नागपूरकर, विजय वालूकर, प्रवीण निंबाळकर, नितीन पांडे, अक्षय जांभूळकर, अशोक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.