हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:44 PM2019-05-14T22:44:55+5:302019-05-14T22:45:45+5:30
हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियासह महाराष्ट्र राज्य हज समितीला पाठविले आहे. शेड्युलनुसार ६ ते १२ सप्टेंबरपर्यंत हज यात्रेकरू परत येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियासह महाराष्ट्र राज्य हज समितीला पाठविले आहे. शेड्युलनुसार ६ ते १२ सप्टेंबरपर्यंत हज यात्रेकरू परत येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना होतात. यावर्षी नागपूर जिल्ह्यातून सामान्य आणि आरक्षित वर्गवारीतून ६३४ जण हज यात्रेसाठी रवाना होणार आहे. नागपूर जिल्ह्यातून हज यात्रेकरू वाढण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, हज कमिटी ऑफ इंडियाला शेड्यूल मिळाले आहे. त्यानुसार २५ जुलैला पहिले उड्डाण राहणार आहे. हे शेड्युल संभाव्य आहे. याचे अंतिम स्वरूप हज कमिटी ऑफ इंडियाकडून येणार आहे. २५ जुलैच्या पहिल्या उड्डाणानंतर २६ जुलैला दोन, २७ ला दोन, २८ ला तीन, २९ ला दोन, ३० ला एक आणि ३१ जुलैला दोन उड्डाणे राहणार आहेत.