हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:39 IST2025-04-01T11:38:21+5:302025-04-01T11:39:55+5:30

अल्फा वेव्ह ग्लोबलला विकणार ६% हिस्सा : कंपनीच्या ८६,००० कोटींच्या मूल्यांकनावर १३,१०० कोटींचा करार

Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore | हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारतीय बहुराष्ट्रीय स्नॅक्स आणि मिठाई कंपनी हल्दीराम स्नॅक्स फूइसने सिंगापूरस्थित जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकसोबत भारतीय कंपनीतील ९ टक्क्यांहून अधिक हिस्सा विकण्यासाठी करार केल्याची माहिती आहे. कंपनीने कराराचा आकार जाहीर केला नसला तरी, बाजारातील अंदाजानुसार तो ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. कंपनीचे मूल्य १० अब्ज डॉलर्स (८६,००० कोटी) इतके आहे, हे विशेष.


करारांतर्गत टेमासेक हल्दीरामच्या विद्यमान भागधारकांकडून इक्विटी हिस्सा खरेदी करेल. या करारासाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या पीडब्ल्यूसी इंडियाने सांगितले, या व्यवहारामुळे हल्दीरामचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार होईल. कंपनी त्याच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजना सुरू ठेवू शकेल. वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत कंपनीची उपस्थिती मजबूत होईल.


अल्फा वेव्ह ही एक जागतिक गुंतवणूक कंपनी
हल्दीरामने सोमवारी आयएचसी (इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी) आणि अल्फा वेव्ह ग्लोबल या दोन नवीन गुंतवणूकदारांना हिस्सा विकण्याची पुष्टी केली. परंतु, निवेदनात कराराची तपशीलवार माहिती देण्यात आली नाही. हल्दीरामने अमेरिकन गुंतवणूक कंपनी अल्फा वेव्ह ग्लोबलला सोमवारी ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत ६ टक्के हिस्सा विकल्याची माहिती आहे. अल्फा वेव्ह ही एक जागतिक गुंतवणूक कंपनी असून खासगी इक्विटी, खासगी कर्ज आणि सार्वजनिक बाजारपेठेत कार्यरत आहे. तर आयएचसी ही संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक आहे.


२०२३-२४ मध्ये १२,५०० कोटींचे उत्पन्न

  • आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात हल्दीरामने १२,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला. या करारानंतरही कंपनीकडे बहुसंख्य हिस्सा राहील. हल्दीराम भविष्यात आणखी हिस्सेदारी विकण्यासाठी इतर गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.
  • करारासंदर्भात समूहाचे संचालक राजेंद्र अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे हल्दीराममध्ये गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून टेमासेकचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याची माहिती समूहाच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तसेवेला दिली.

Web Title: Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.