डिझेल संपले की अर्ध्या बस आगारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:25+5:302021-08-18T04:11:25+5:30
आगार. कोरोना काळात झालेला तोटा १) गणेशपेठ. ...
आगार. कोरोना काळात झालेला तोटा
१) गणेशपेठ. १९३१ कोटी
२) घाट रोड. १४३० कोटी
३) इमामवाडा. १०७८ कोटी
४) वर्धमाननगर. १२४८ कोटी
५) रामटेक. ९३२ कोटी
६) सावनेर. ९४३ कोटी
७) उमरेड. १०९४ कोटी
८) काटोल. १०९३ कोटी
चारा आगारांचे डिझेल बंद
डिझेलचे भाव वाढल्यामुळे एसटी महामंडळ संकटात सापडले आहे. एसटीने अद्यापही तिकिटांचे दर वाढविण्याची घोषणा केली नाही. त्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे; परंतु डिझेल संपले की एसटीच्या अर्ध्या बस ठप्प होतात. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभागात चार आगारांचे डिझेल बंद करण्यात आले आहे. यात वर्धमाननगर, इमामवडा, सावनेर आणि उमरेड या आगारांचे डिझेल बंद करण्यात आले आहे. या डेपोच्या बस गणेशपेठ, घाट रोड, काटोल आणि रामटेक आगारातून डिझेल भरतात.
बस आगारात संपले की बस आगारातच
डिझेल संपले की प्रवाशांची गैरसोय होते. एसटी महामंडळ हा शासनाचा उपक्रम आहे; परंतु शासन या उपक्रमाविषयी उदासीन आहेत. उत्पन्न वाढविण्यासाठी शासन कोणताही उपक्रम राबवीत नाही. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट आले आहे. डिझेल संपले की एसटीच्या अर्ध्या बस आगारात उभा राहत असल्याची स्थिती आहे.
डिझेल पुरवठा सुरळीत होईल
डिझेल संपल्यामुळे एसटीचे काही किलोमीटर रद्द झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. तरीसुद्धा २४ ऑगस्टपासून डिझेल पुरवठा सुरळीत होईल.
-शिवाजी जगताप उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती ३, मुंबई
....