मंगळवारी अर्ध्या नागपूर शहाराचा पाणीपुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 02:12 PM2022-03-27T14:12:27+5:302022-03-27T14:38:01+5:30
शटडाऊन कालावधीत बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्राचे २४ तासांचे शटडाऊन मंगळवारी, २९ मार्चला सकाळी १० ते ३० मार्चला सकाळी १० वाजेपर्यंत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धंतोली, मंगळवारी, गांधीबाग, सतरंजीपुरा व धरमपेठ अशा पाच झोनचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. शटडाऊन कालावधीत बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी राजभवन (गव्हर्नर हाऊस ) स्थित ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील मोठी गळती दुरुस्त तसेच राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवरील फ्लो मीटर लावण्याकरिता गोरेवाडा स्थित जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
झोननिहाय पाणीपुरवठा बंद राहणारे जलकुंभ
मंगळवारी झोन : राजभवन-सादर, राजभवन-राजनगर, गोधनी-गोरेवाडा
धंतोली झोन : रेशीमबाग जलकुंभ, हनुमान नगर जलकुंभ, वंजारी नगर जलकुंभ, वंजारी नगर (नवीन) जलकुंभ
गांधीबाग झोन : सीताबर्डी- फोर्ट जलकुंभ
सतरंजीपुरा झोन : बस्तरवारी जलकुंभ, बोरियापुरा मुख्य जलवाहिनी, वाहन ठिकाना जलकुंभ, बोरियापुरा जलकुंभ
धरमपेठ झोन : राजभवन-सीताबर्डी मुख्य जलवाहिनी ह्या भागातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
शटडाऊन दरम्यान करण्यात येणारी कामे
राजभवन (गव्हर्नर हाऊस ) स्थित ९०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील मोठी गळती दुरुस्ती.
राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवरील फ्लो मीटर लावणे.
पेंच १ जलशुद्धीकरण केंद्र येथील तांत्रिक देखभाल व विद्युत देखभालीची कामे.