जीर्ण घरावर हातोडा, ४१० अतिक्रमणे तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:50+5:302021-02-11T04:10:50+5:30

- पाच ट्रक सामान जप्त, १७ हजारांचा दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी शहरातील ...

Hammer on dilapidated house, breaking 410 encroachments | जीर्ण घरावर हातोडा, ४१० अतिक्रमणे तोडली

जीर्ण घरावर हातोडा, ४१० अतिक्रमणे तोडली

Next

- पाच ट्रक सामान जप्त, १७ हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी शहरातील दहाही झोनमध्ये कारवाई करीत ४१० अतिक्रमणे तोडली. पाच ट्रक सामान जप्त करून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोबतच सतरंजीपुरा झोनमधील दलालपुरा सिमेट रोड येथील शानग्रावर यांचे जीर्ण घर जमीनदोस्त करण्यात आले.

त्यानंतर जागनाथ बुधवारी येथील भरणकर गल्लीमधील अवैध भिंत तोडण्यात आली. दिही बाजार पूल ते मारवाडी चौक, तबला बाजार चौक, मारवाडी चौक ते मच्छी मार्केट चौक, जुना भंडारा रोड येथील ६० अतिक्रमणे तोडण्यात आली. लक्ष्मीनगर झोनमध्ये एअरपोर्ट ते लोकमत चौक, रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी, आंबेडकर कॉलेज रोडवरील फुटपाथवरून ५२ अतिक्रमणे व अवैध होर्डिंग काढण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये मनपा मुख्यालय ते संविधान चौक, आकाशवाणी चौक, बर्डी येथे ठेले व दुकाने काढण्यात आली. अमरावती रोड, विद्यापीठाच्या पुढील भाजी, कबाडी व फर्निचरची दुकाने काढून सामान जप्त करण्यात आले.

हनुमाननगर झोनमध्ये झोन कार्यालय ते मानेवाडा चौक, तुकडोजी स्मारक ते क्रीडा चौक, सक्करदरा चौक, शुक्रवारी रोड आदी ठिकाणांवरून ५४ अतिक्रमणे तोडण्यात आली. नेहरूनगर झोनमध्ये हसनबाग रोड ते ज्योती शाह रोड, ईश्वरनगर, शितला माता मंदिर रोड, मोठा ताजबाग येथून ११ होर्डिंग, २० बॅनर व ५६ अतिक्रमणे तोडण्यात आली. लकडगंज झोनमध्ये छापरूनगर चौक ते वर्धमाननगर चौक, वैष्णोदेवी चौक येथून दुकाने, ठेले अशी ५६ अतिक्रमणे तोडण्यात येऊन ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

आसीनगर झोनमध्ये वैशालीनगर क्वॉर्टर नंबर ३२४ (९/१) निवासी नामदेव महादेव देवघरे यांचे अवैध घर तोडण्यासाठी गेलेल्या पथकाने एक भिंत तोडली. त्यानंतर त्यांना घराची कागदपत्रे सादर करण्याकरिता पाच दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर वैशालीनगर, बाबाजी बुद्धाजी नगर, ऑटोमोटिव्ह चौक, कपिनलगर, टेकानाका, इंदोरा चौक येथून ५८ अतिक्रमणे तोडण्यात आली. तेथून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनमध्ये अवस्थीनगर, बोरगाव, दिनशॉ फॅक्टरी, फ्रेण्डस कॉलनी येथून ठेले व दुकानांची ५२ अतिक्रमणे तोडण्यात आली. तेथून दीड हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Hammer on dilapidated house, breaking 410 encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.