गँगस्टर रणजित सफेलकरच्या ‘राजमहाल’वर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:32+5:302021-04-29T04:06:32+5:30
सफेलकरने कामठी मार्गावरील ही जागा एका गरीब व्यक्तीकडून दहशतीच्या जोरावर बळकावली होते. जागेच्या आजूबाजूचा भाग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित होता ...
सफेलकरने कामठी मार्गावरील ही जागा एका गरीब व्यक्तीकडून दहशतीच्या जोरावर बळकावली होते. जागेच्या आजूबाजूचा भाग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित होता व तेथील कालवा बुजवून त्याने सेलिब्रेशन हॉल उभारला. पाटबंधारे विभागाकडूनदेखील त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच कामठीतील त्याने केलेल्या अनधिकृत बांधकामावरदेखील लवकरच हातोडा चालेल, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सेना बरखास्त होणार?
सफेलकरने श्रीराम सेनेत अनेक गुंडांना प्रवेश दिला होता. यासंदर्भात गुन्हे शाखेने धर्मादाय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. श्रीराम सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे, असे राजमाने यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या गुंडावर कारवाई
गेल्या वर्षी गुन्हे शाखा पोलिसांनी गँगस्टर संतोष आंबेकर आणि खंडणीबाज साहिल सय्यद यांचेही बंगले अशाच प्रकारे जमीनदोस्त केले होते. आता सफेलकरचे बांधकाम पाडणे सुरू झाले आहे.