अशोक धवड यांच्यासह पाच आरोपींना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 07:43 PM2019-07-04T19:43:22+5:302019-07-04T19:44:49+5:30

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) यांच्यासह किरण अशोक धवड (५९), नाना केशव देवलकर (७८), डॉ. प्रभाकर गोपाल धानोरकर (६८) व कृष्णा महादेव निरुळकर (६७) यांनी दाखल केलेला अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.

Hammered to five accused including Ashok Dhawad | अशोक धवड यांच्यासह पाच आरोपींना दणका

अशोक धवड यांच्यासह पाच आरोपींना दणका

Next
ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : अटकपूर्व जामीन अर्ज खारीज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) यांच्यासह किरण अशोक धवड (५९), नाना केशव देवलकर (७८), डॉ. प्रभाकर गोपाल धानोरकर (६८) व कृष्णा महादेव निरुळकर (६७) यांनी दाखल केलेला अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. अन्य आरोपी विजय बाभरे, राजेंद्र पिंपळकर व विकेश जोशी यांच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय दिला जाणार आहे.
बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. न्यायालयात आरोपींतर्फे अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. किशोर आंबिलवादे, अ‍ॅड. नीलेश फुलझेले व अ‍ॅड. नीरज करडे तर, सरकारतर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Hammered to five accused including Ashok Dhawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.