आशिष देशमुखांच्या चौकशीसाठी हंडोरे दाखल, पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 08:25 PM2021-09-28T20:25:04+5:302021-09-28T20:26:56+5:30

Nagpur News काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांनी जि.प. निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे मंगळवारी नागपुरात दाखल झाले.

Handore at Nagpur for enquiry of Ashish Deshmukh and report to the party leaders | आशिष देशमुखांच्या चौकशीसाठी हंडोरे दाखल, पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार 

आशिष देशमुखांच्या चौकशीसाठी हंडोरे दाखल, पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार 

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतलीदेशमुख भूमिका मांडेनात

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांनी जि.प. निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे मंगळवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी काटोल मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाईल, असे हंडोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

२५ सप्टेंबर रोजी आशिष देशमुख हे सावरगाव जिल्हा परिषद सर्कलच्या भाजप उमेदवार पार्वती काळबांडे यांच्या प्रचारात सावरगाव येथे दिसले होते. या प्रचाराचे फोटो व्हायरल झाल्यावर काँग्रेसचे विभागीय बूथ समन्वय प्रकाश वसु यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत पुराव्यांसह तक्रार केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तक्रारीची दखल घेत शहानिशा करण्यासाठी हंडोरे यांची समिती पाठविली. हंडोरे मंगळवारी नागपुरात दाखल होताच प्रकाश वसु, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सिरिया, युवक काँग्रेसचे काटोल विधानसभा अध्यक्ष पदम डेहनकर, नरखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुदर्शन नवघरे आदींनी त्यांची भेट घेतली. फोटो, व्हिडीओसह पुरावे सोपविले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही कारवाईची मागणी केली. आता हंडोरे या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहेत. दरम्यान, भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचे आरोप होत असताना देशमुख यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. लोकमतने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

 

देशमुख यांचा आणखी एक व्हिडीओ

- भाजपचे भिष्णुर जि.प. सर्कलचे उमेदवार नितीन धोटे यांच्यासाठीही आशिष देशमुख हे मत मागत असल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. देशमुख एवढ्या उघडपणे भाजपचा प्रचार का करीत आहेत, त्यांचा रोष कुणावर आहे, त्यांना काँग्रेसचा हात सोडायचा आहे का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Web Title: Handore at Nagpur for enquiry of Ashish Deshmukh and report to the party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.