जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते ‘त्या’ शिक्षक पत्नींना प्रत्येकी १५ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:36 AM2019-05-03T00:36:29+5:302019-05-03T00:37:11+5:30

लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी १५ लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.

On the hands of District Collector Mudgal, the teacher wives each of the 15 lakhs help | जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते ‘त्या’ शिक्षक पत्नींना प्रत्येकी १५ लाखाची मदत

जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते ‘त्या’ शिक्षक पत्नींना प्रत्येकी १५ लाखाची मदत

Next
ठळक मुद्देनिवडणूक काळातील चांपा शिवारात झाला होता कार अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी १५ लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आणि उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी योगिता नुकेश मेंढुले यांना तर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी माधुरी पुंडलिक बाहे यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरेड शाखेत देय असलेले हे धनादेश वितरित केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाची पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पुंडलिक बापूराव बाहे (५६), रा. राहाटे ले-आऊट हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालय, साळवा, ता. कुही येथे आणि नुकेश नारायण मेंढुले (३८) रा. भांडारकर ले-आऊट हे अशोक कन्या विद्यालय, उमरेड येथे कार्यरत होते. हे दोन्ही शिक्षक लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घरी जात असताना उमरेड-नागपूर मार्गावर चांपा शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला होता.

Web Title: On the hands of District Collector Mudgal, the teacher wives each of the 15 lakhs help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.