शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला फासावर लटकवा : निवेदनाद्वारे केली सुरक्षेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 10:07 PM2020-02-04T22:07:47+5:302020-02-04T22:09:09+5:30

हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

Hang the accused who burns the teacher | शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला फासावर लटकवा : निवेदनाद्वारे केली सुरक्षेची मागणी

शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला फासावर लटकवा : निवेदनाद्वारे केली सुरक्षेची मागणी

Next
ठळक मुद्देमहिला संघटनांनी केला घटनेचा निषेध

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मंगळवारी विविध महिला संघटनांनी याबाबत निवेदन सादर केले.
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ तसेच शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. एका शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर अशाप्रकारे अमानुष हल्ला झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बलात्कार असो किंवा अ‍ॅसिड हल्ला, महिलांना वारंवार अत्याचाराचा सामना करावा लागतो. पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न हा त्यातलाचा प्रकार असून सातत्याने महिला, मुली विकृत मानसिकतेच्या बळी ठरत आहेत. त्यामुळे शासन, पोलीस प्रशासन आणि महिला संघटनांच्यावतीने संयुक्तपणे उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यालय व मुलींचे महाविद्यालय, वसतिगृह अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त, पेट्रोलिंग गस्त ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाची लाट आहे. गंभीर जखमी असलेल्या पीडित शिक्षिकेला त्वरित न्याय देण्याची गरज आहे. न्यायास उशीर झाल्यास न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल अशी भीती संघटनांनी व्यक्त केली. त्यामुळे त्वरित खटला चालवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना व त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक तसेच संगीता उपरीकर, अर्चना सिडाम, सुनिता जिचकार, ज्योती ढोके, अ‍ॅड. शितल शुक्ला, शालिनी सरोदे, नलिनी करांगळे, कविता हिंगणकर, सुजाता सरनाईक, बेबीताई गाडेकर तसेच ओबीसी महासंघाच्या कल्पना मानकर, नंदा देशमुख, लक्ष्मी सावरकर, रेखा बाराहाते, वृंदाताई ठाकरे, नयना झाडे, निर्मला मानमोडे, विजया धोटे, प्रांजली ताल्हन, सुषमा साबळे, माया घोरपडे, साधना बोरकर, वर्षा भोयर, मंगला अल्लरवार, मीरा मदनकर, पूर्णिमा कारोळे, राणी साबळे, स्नेहल बोरकर आदींचा सहभाग होता.

Web Title: Hang the accused who burns the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.