दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

By Admin | Published: July 21, 2016 02:03 AM2016-07-21T02:03:18+5:302016-07-21T02:03:18+5:30

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ...

Hang Dabholkar's killers | दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

googlenewsNext

अंनिसचे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटनांनी संविधान चौकात नारे-निदर्शने आंदोलन केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी लावावी, सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे या एएनआयला हव्या असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे एएनआयच्या वेबसाईटवर असलेले फोटो राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात लावावी, भाजपातील कार्यकर्ते सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती या संघटनांना पाठिंबा देतात त्यांना समज द्यावी, सनातनवरील बंदीविषयी राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने भूमिका जाहीर करावी, आदी मागण्या आंदोलनादरम्यान रेटून धरण्यात आल्या. आम्ही सारे पानसरे, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार आदी घोषणा आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी दिल्या.
आंदोलनानंतर अंनिसचे जिल्हाध्यक्ष संजय शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पखिड्डे, प्रधान सचिव विनोद उलीपवार, अग्रगामी किसान सभेचे अरुण वनकर, सीपीआयचे हरेन श्रीवास्तव, मुस्लीम महिला मंचाच्या लीना बागडे, निखत शेख, प्रयास सोशल फाऊंडेशनचे प्रवीण मानवटकर, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे, आम आदमी पार्टीचे जगजितसिंग, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे जम्मु आनंद, शिक्षण संघर्ष समितीचे विजय बाभुळकर, भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hang Dabholkar's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.