पाच आदिवासींची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:25+5:302021-07-17T04:08:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : देवास (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील नेमावर पाेलीस ठाण्यांतर्गत पाच आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या करण्यात आली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : देवास (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील नेमावर पाेलीस ठाण्यांतर्गत पाच आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सीआयडी(गुन्हे अन्वेषण विभाग)मार्फत चाैकशी करून दाेषींना फाशी शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गाेंडवाना गणतंत्र पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि.१६) दुपारी रामटेक तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी त्यांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.
नेमावर, जिल्हा देवास, मध्य प्रदेश येथील आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आराेपीने त्या महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा खून केला. त्यानंतर सर्व मृतदेह आराेपीने त्याच्या शेतात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला दीड महिना पूर्ण झाला तरी पाेलीस प्रशासनाने आराेपीला अटक केली केली नाही. राजकीय दबावामुळे हे खून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप या निवेदनात केला आहे.
यासंदर्भात गाेंगपाचे राष्ट्रीय महासचिव बलदेवसिंह ताेमर यांनी अनेकदा कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आराेपही गाेंगपाच्या सदस्यांनी केला. तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शनादरम्यान नारेबाजी केल्यानंतर त्यांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.
...
या आहेत मागण्या
आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या खूनप्रकरणातील आराेपीला तातडीने अटक करावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पाेलिसांनी सबळ पुरावे गाेळा करून ते न्यायालयात सादर करावे, राजकीय दबावाला बळी पडून आराेपीला पाठीशी घालणाऱ्या देवास येथील अप्पर पाेलीस अधीक्षक व ठाणेदार यांच्यासह इतर दाेषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, पीडित कुटुंबातील सदस्यांना एक काेटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नाेकरी द्यावी, पाेक्सो व ॲट्राॅसिटी कायद्यान्वये कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.