पुण्यकर्माने होते सुखाची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:11+5:302020-12-31T04:11:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इतवारीतील लाडपुरा येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिरात बुधवारी विश्वशांती आणि कोरोना महामारीच्या ...

Happiness is achieved through meritorious deeds | पुण्यकर्माने होते सुखाची प्राप्ती

पुण्यकर्माने होते सुखाची प्राप्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इतवारीतील लाडपुरा येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिरात बुधवारी विश्वशांती आणि कोरोना महामारीच्या समाप्तीकरिता भगवान पार्श्वनाथांचा अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना पुण्यकर्माची महत्ती उलगडून सांगितली.

त्यांनी सांगितले, आदिपुराणात आचार्य जिनसेन यांनी पुण्यकर्म प्राप्तीचे मार्ग विशद केले आहेत. भगवंताचा अभिषेक, संतांना आहार दान, व्रतधारण आणि निर्जल उपवासाने पुण्यकर्म प्राप्त होते. मात्र, हे कार्य नि:स्वार्थ बुद्धीने करावे लागेल. नि:स्वार्थ हेतूने केलेले पुण्यकर्म फलदायी असते. हिंसादी अव्रत दु:दायक नरकप्राप्तीचे कारण भरतात. म्हणून व्रतांचे पालन करून स्वर्गात जाणे श्रेष्ठ आहे. अव्रती राहून नरक भोगणे योग्य नाही.

दीपप्रज्वलन पन्नाला खेडकर, अध्यक्ष सतीश पेंढारी, मंत्री उदय जोहरापुरकर, महासमिती अध्यक्ष सुनील पेंढारी, किरण जोहरापूरकर, प्रचार प्रसार मंत्री हिराचंद मिश्रीकोटकर व विलास आग्रेकर यांनी केले. मंगलाचरण पंकज खेडकर यांनी गायले. शास्त्र भेट सौधर्म इंद्र अविनाश मुधोळकर व अल्पिता मुधोळकर यांनी केले. धर्मसभेचे संचालन सतीश पेंढारी यांनी केले. यावेळी दिनकरराव जोहरापुरकर, राजकुमार खेडकर, द्विपेंद्र जोहरापुरकर, राजकुमार जेजानी, डॉ. सुरेश जोहरापुरकर, सुभाष देवलसी, दीपक दर्यापुरकर, गजकुमार चवरे, नरेंद्र तुपकर, सरोज मिश्रिकोटकर, नलिनी लाड, नंदा जोहरापुरकर, संगीता पेंढारी, निता पेंढारी, प्रीती पेंढारी, स्नेहा खेडकर, स्नुषा खेडकर, विराज खेडकर, परिमल खेडकर, सुधिर सावलकर उपस्थित होते.

आगामी कार्यक्रम

आचार्यश्रींच्या सानिध्यात ३१ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता आचार्यश्री कुंथूसागरजी यांचा ५५वा दीक्षा दिवस आणि ७५वा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय हीरक महोत्सव म्हणून साजरा केला जाईल. सकाळी ९ वाजता प्रवचन होईल. १ जानेवारी रोजी विश्वशांती आणि कोरोना महामारीच्या समाप्तीकरिता भगवान पार्श्वनाथ यांना अभिषेक घातला जाईल. ९ जानेवारीला तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू आणि भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म व तप कल्याणक साजरा होईल. या दरम्यान भगवंताला १००८ कलशांद्वारे अभिषेक घातला जाईल.

Web Title: Happiness is achieved through meritorious deeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.