सखींनी लुटला ‘फिटनेस टूर’चा आनंद
By admin | Published: October 4, 2015 03:30 AM2015-10-04T03:30:21+5:302015-10-04T03:30:21+5:30
नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गसंपन्न वातावरणातील धानोली येथील रिसोर्टवर सखींनी एरोबिक्स, योगा, वेट मॅनेजमेंट, भोजन, ...
फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये झुंबा, एरोबिक्स, मनोरंजनाची धमाल
नागपूर : नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गसंपन्न वातावरणातील धानोली येथील रिसोर्टवर सखींनी एरोबिक्स, योगा, वेट मॅनेजमेंट, भोजन, स्विमिंग, एक्वा एरोबिक्स व अंताक्षरी खेळाचा आनंद लुटत धमाल केली. हा एक अविस्मरणीय दिवस ठरला. निमित्त होते लोकमत सखी मंच व फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित अभिनव सहल ‘फिटनेस टूर’चे.
शुक्रवारी सकाळी सखी मंचची एक चमू वर्धा रोड मिहानजवळील वेणा नदीलगत असलेल्या या रिसोर्टवर पोहचली. येथे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध खेळांसोबतच सखींनी निरोगी आरोग्याच्या टिप्स जाणून घेतल्या. रिसोर्टवर सहल पोहचताच सर्व सखींनी नाश्ता केला. नंतर झुंबा डान्सला सुरुवात झाली.
यात कधीही न नाचलेल्या सखींही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर एकापेक्षा एक सरस व्यायामाच्या प्रकाराला सुरुवात झाली.
एरोबिक्सचे विविध स्टेप्स सखींनी जाणून घेतले. स्विमिंगचा आनंदही लुटला. एवढेच नव्ह ेतर ‘एक्वा एरोबिक्स’ही केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला.
थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा विविध खेळ, अंताक्षरी आणि मनोरंजक हौजी खेळात सखी हरखून गेल्या. ‘वन मिनीट गेम शो’मधून सखींना विविध पुरस्कार जिंकण्याची संधी मिळाली.
याच दरम्यान ‘फिगर फ्रेमिंग’च्या संचालिका सुरेखा माहोरकर यांनी सखींच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रत्येक सखींनी स्वत:वर प्रेम करायला हवे. यामुळे स्वत:कडे विशेष लक्ष देता येईल, चांगले आरोग्य लाभेल.
फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूट आरोग्य सेवा आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात मध्य भारतातील अग्रणी संस्था आहे. गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहे.
ही संस्था नागपूरमध्ये नरुला बिल्डिंग, ८, फार्मलॅण्ड, लोकमत चौक वर्धा रोड येथे आहे. येथे आरोग्याशी संबंधी योगा, जिम, एरोबिक्स, झुंबा, कॉर्डिओ युनिट, वजन कमी करणे, वाढविणे आदींची सोय उपलब्ध असल्याचीही माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)