बहिणीला त्रास दिला, भावांनी जावयाचा हात फॅ्रक्चर केला; भावांविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: December 24, 2023 01:14 PM2023-12-24T13:14:48+5:302023-12-24T13:15:29+5:30
भरोसा सेलमध्ये झाला होता समझोता
नागपूर : बहिणीला का त्रास देतो असे म्हणून दोन भावांनी आपल्या जावयाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ डिसेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान जावयाने दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मच्छींद्र धनराज घरडे (वय ३४) आणि विजय धनराज घरडे (वय ३३) दोघे रा. कंट्रोलवाडी अशी अटक करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. तर रवि गुलाबराव खोब्रागडे (वय ४०, रा. खडगाव रोड, सोनबानगर वाडी) असे फिर्यादी जावयाचे नाव आहे. फिर्यादी रवि आणि त्यांच्या पत्नीचा वाद सुरु होता. भरोसा सेलमध्ये त्यांच्यात समझोताही झाला होता. परंतु त्यानंतरही रवि बहिणीला त्रास देत असल्याचे समजल्यामुळे आरोपी मच्छींद्र आणि विजय रविच्या घरी गेले. त्यांनी आमच्या बहिणीला तु का त्रास देतो ? अशी विचारना करून रविसोबत भांडण केले. त्यानंतर दोघांनी रविला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा डावा हात फ्रॅक्चर केला. रविवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
उपचार पूर्ण झाल्यानंतर रविने शनिवारी २३ डिसेंबरला आपल्या साळ््यांविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वाडी ठाण्याचे उपनिरीक्षक विजेंद्र नाचन यांनी आरोपींविरुद्ध कलम ३२६, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.