बलात्कार पीडितेसह दोघींची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:08 AM2021-09-11T04:08:03+5:302021-09-11T04:08:03+5:30
........... प्लॉट विकून १९ लाखांची फसवणूक नागपूर : प्लॉटची विक्री करून फसवणूक करणाऱ्या डेव्हलपर आणि जमीन मालकाविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी ...
...........
प्लॉट विकून १९ लाखांची फसवणूक
नागपूर : प्लॉटची विक्री करून फसवणूक करणाऱ्या डेव्हलपर आणि जमीन मालकाविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सूर्यभान आकरे (७५), रा. धन्वंतरीनगर आणि रितेश देवानंद सोनारे (३२), रा. बजाजनगर अशी आरोपींची नावे आहेत. सोनारेने आकरेच्या जमिनीवर लेआऊट टाकले होते. त्याने २०११ मध्ये यशवंत आपतूरकर (३९), रा. आशीर्वादनगरला प्लॉटची विक्री केली. आपतूरकर शिक्षक आहे. आकरे आणि सोनारेने आपतूरकरसह ११ जणांना प्लॉटची विक्री केली. इतर १० जण भंडारात शिक्षक आहेत. त्या मोबदल्यात १८.३८ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. पैसे घेऊनही आरोपी प्लॉटची रजिस्ट्री करून देत नसल्यामुळे आपतूरकरने बजाजनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
..................