विवाहित महिलेची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:41+5:302021-09-02T04:19:41+5:30

.......... शोरूममध्ये कॅशिअरची आत्महत्या नागपूर : ऑटोमोबाईल शोरूमच्या कॅशिअरने गफळास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण बजाईत (४७) रा. संजयनगर, हसनबाग ...

Harassment of a married woman | विवाहित महिलेची छेडखानी

विवाहित महिलेची छेडखानी

Next

..........

शोरूममध्ये कॅशिअरची आत्महत्या

नागपूर : ऑटोमोबाईल शोरूमच्या कॅशिअरने गफळास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण बजाईत (४७) रा. संजयनगर, हसनबाग असे आत्महत्या करणाऱ्या कॅशिअरचे नाव आहे. ते लकडगंजमधील एका ऑटोमोबाईलच्या दुकानात काम करीत होते. बजाईत दररोज सकाळी नऊ वाजता येत होते. आज सकाळी ८.३० वाजता ते शोरूममध्ये आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कक्षात फाशी घेतली. सकाळी नऊ वाजता इतर कर्मचारी आल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बजाईतच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना सूचना देण्यात आली. बजाईत यांनी आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही. मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याची चर्चा आहे. परंतु मंगळवारी रात्रीपर्यंत ते सामान्यपणे वागत असल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. ते बऱ्याच काळापासून शोरूममध्ये कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

..........

Web Title: Harassment of a married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.