सायबर गुन्हेगारांकडून महिलेची छेडखानी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:14+5:302021-07-15T04:07:14+5:30
नागपूर : पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मोबाईलवर पाठवून तिची छेड ...
नागपूर : पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मोबाईलवर पाठवून तिची छेड काढल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सायबर गुन्हेगारांच्या या कृत्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
सदर येथील रहिवासी २६ वर्षाची महिला नर्स आहे. तिला २ जुलैला फेसबुकवर बजाज फायनान्सतर्फे कमी वेळात कर्ज देण्याची जाहिरात आली. त्या आधारे महिलेने २.५० लाखाचे कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. काही वेळानंतर अज्ञात व्यक्तीने महिलेला फोन केला. कर्ज मंजूर झाले असून २५०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. महिलेने पैसे पाठविल्यानंतर त्या व्यक्तीने कर्जाच्या मोबदल्यात पहिल्या किश्तीचे ४ हजार रुपये त्वरित ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने दबाव टाकल्यामुळे महिलेने त्याला आपल्या पतीचा मोबाईल नंबर दिला. त्या व्यक्तीने महिलेच्या पतीशी संपर्क केला असता त्याने आधी कर्जाची रक्कम देण्यास सांगितले. त्यामुळे दोघात वाद झाला. आरोपीने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून बनावट गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने महिला आणि तिच्या पतीला नग्न फोटो आणि व्हिडीओ पाठविले. महिलेने याबाबत सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी फसवणुक, धमकी देणे तसेच छेडखानीचा गुन्हा दाखल केला आहे. पैसे न दिल्यास सायबरांनी गुन्हेगार शिवीगाळ करणे किंवा धमकी देण्याच्या घटना घडतात. परंतु महिलेसोबत अश्लील व्यवहार करणे गंभीर आहे. शहरात काही दिवसात सायबर गुन्हेगारांनी फसविण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचा सायबर सेल पाच-दहा हजाराचे मोबाईल परत करण्यात व्यस्त आहे. सायबर गुन्हेगारांची टोळी मात्र त्यांच्या हाती लागत नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांना नाचगाणे आणि मैत्रीसाठी वेळ घालविण्यापासून सवड मिळत नाही. वरिष्ठ अधिकारीही त्यांच्या नाचगाण्यापासून खूश असल्याचे चित्र दिसत आहे.
..............