रुग्णालयात बेड मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:20+5:302021-03-24T04:08:20+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या नियंत्रण कक्षाला खासगी रुग्णालयांकडून सकाळी बेड असल्याचे सांगितले जाते आणि सायंकाळ हाेताच बहुतेक रुग्णालयांना संपर्क केला ...

Hard to get a hospital bed | रुग्णालयात बेड मिळणे कठीण

रुग्णालयात बेड मिळणे कठीण

Next

मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या नियंत्रण कक्षाला खासगी रुग्णालयांकडून सकाळी बेड असल्याचे सांगितले जाते आणि सायंकाळ हाेताच बहुतेक रुग्णालयांना संपर्क केला असता बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येते. रात्री अचानक बेड कसे फुल्ल हाेतात, हा प्रश्न पडताे.

डॉक्टरही फाेन उचलत नाही

काेराेना रुग्णांसाठी व्यवस्था असलेली खासगी रुग्णालये सायंकाळनंतर फाेन उचलत नाहीत. या रुग्णालयांचे डाॅक्टरही फाेन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नाही तर रुग्णालयांचे मॅनेजर आणि कर्मचारीही फाेन उचलण्यास तयार नाहीत. काही लाेक फाेन उचलल्यानंतरही बेड रिकामे नाही, एवढे बाेलून फाेन कट करीत असल्याचा अनुभव येत आहे.

दरराेजचा खर्च ८ ते १६ हजार रुपयांपर्यंत

काही रुग्णांच्या नातेवाइकानुसार खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन बेडसाठी ८ ते १६ हजार रुपयांपर्यंत वसूल केले जात आहेत. ही लूट लक्षात घेत महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या रिसेप्शन काउंटरजवळ किंवा दर्शनी भागात रेट बाेर्ड लावणे आवश्यक आहे. रुग्णालयाच्या बिलाबाबत नातेवाइकांना तक्रार करायची असल्यास या फलकावर संबंधित अधिकाऱ्यांचे माेबाईल क्रमांक नाेंदविण्यात यायला हवेत.

मनपा रुग्णालयामध्येही मिळत नाही उत्तर

महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातही रुग्णाला भरती करण्यासाठी संपर्क केला असता उत्तर मिळत नाही. साेमवारी रात्री ८.३० वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काेणत्याही कर्मचाऱ्याने फाेन उचलला नाही.

सीताबर्डीत नाही, वानाडोंगरीत मिळेल बेड

महापालिकेच्या काेविड रुग्णालयांच्या यादीत शहराच्या मध्यभागी सीताबर्डी येथे एका खासगी रुग्णालयाच्या समावेश आहे. मात्र साेमवारी रात्री संपर्क केला असता या रुग्णालयात काेराेना बाधित रुग्णांची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णालय कर्मचाऱ्याने त्यांच्या वानाडाेंगरी येथील रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र या रुग्णालयातही व्हेंटिलेटर व ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेड रिकामे नसल्याचे कळले. केवळ नाॅर्मल बेडच उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Hard to get a hospital bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.