नागपुरातील वारकरी हरिनाम सप्ताहात हरिकीर्तनाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:01 AM2018-11-18T01:01:08+5:302018-11-18T01:02:40+5:30
झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरातील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानतर्फे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
सप्ताहात गोपी गीत प्रवक्ता श्री श्री १००८ स्वामी सुदर्शनाचार्य महाराज यांची कथा सकाळी ८.३० वाजता आणि दुपारी ३ वाजता होत आहे. सप्ताहात शुक्रवारी संजय महाराज शिंदे (आळंदी) यांचे हरिकिर्तन झाले. शनिवारी पुसद येथील भागवताचार्य सुरेश महाराज बाकडे यांचे कीर्तन झाले. सप्ताहात दररोज रात्री ८ वाजता हरिकीर्तन होईल. यात १८ नोव्हेंबरला मूर्तिजापूर येथील पं. सोपान महाराज काळबांडे यांचे कीर्तन, १९ रोजी रामराव महाराज ढोक (वंडली) नागपूरकर यांचे कीर्तन, २० रोजी लक्ष्मणदास महाराज काळे, पुणे यांचे कीर्तन, २१ रोजी देवगोपाल महाराज शास्त्री जळगाव खानदेश यांचे कीर्तन आणि २२रोजी केशव महाराज उखळीकर, परळी वैजनाथ यांचे कीर्तन होणार आहे. २३ रोजी सकाळी ८ वाजता पालखी सोहळा होईल. सकाळी ११.३० वाजता केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी २ वाजता महाप्रसाद होईल. वारकरी हरिनाम संकिर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष संतोष गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष भानुदास मलवार, गणेश मोथे, नामदेव बारसागडे, राजेंद्र बढिये, योगेश बांगडे, राजेश पाचतोडे, शंंकर इंगोले, अनिल मिश्रा, बाबाराव चव्हाण, दिनेश श्रीखंडे सोहळ्यासाठी परीश्रम घेत आहेत.