कोचिंगवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अश्लिल चाळे
By योगेश पांडे | Published: July 18, 2024 04:05 PM2024-07-18T16:05:31+5:302024-07-18T16:11:01+5:30
Nagpur : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोचिंग क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अश्लिल चाळे करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
अरमान हुसैन उर्फ अबरार हुसैन (२७, पारडी) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशमधील मंदरेवा येथील निवासी आहे. १६ जुलै रोजी एक अल्पवयीन मुलगा रात्री आठ वाजताच्या सुमारास कोचिंग क्लासवरून घरी परत येत असताना अरमानने त्याला अडविले. रस्त्यावरच त्याने त्याच्याशी अश्लिल चाळे सुरू केले. या प्रकाराने हादरलेल्या मुलाने तेथून पळ काढत घर गाठले व पालकांना माहिती दिली. त्याच्या पालकांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपी अरमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशा प्रकारे त्याने इतर मुलांचीदेखील छळवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.