हरभऱ्यावरील घाटेअळी नियंत्रण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:09+5:302021-01-23T04:10:09+5:30

हिंगणा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने उमेद अभियानांतर्गत हिंगणा पंचायत समितीच्या सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे ...

Harvest control program on gram | हरभऱ्यावरील घाटेअळी नियंत्रण कार्यक्रम

हरभऱ्यावरील घाटेअळी नियंत्रण कार्यक्रम

Next

हिंगणा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने उमेद अभियानांतर्गत हिंगणा पंचायत समितीच्या सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शेतकरी गटाच्या महिला सदस्यांना हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणाबाबत माहिती देत प्रशिक्षण देण्यात आले.

या शेतकरी महिलांना घाटेअळीचे जीवनचक्र समजावून सांगत त्यांच्या नियंत्रणासाठी घरीच एचएएनपीव्ही या विषाणूंची निर्मिती करणे, त्याची तयार करण्याची व वापरण्याची पद्धती, घाटेअळीमुळे हरभऱ्याच्या पिकांचे हाेणारे नुकसान यांसह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयाेजन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी वनामतीचे उपसंचालक प्रभाकर शिवणकर, प्रकल्प समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सीमा मुंडले, तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ कृषी अधिकारी आर. पी धनविजय, मेश्राम, सतीश बन्साेड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत शेंडे यांनी विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले.

Web Title: Harvest control program on gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.