धक्कादायक! 'त्याचा आत्मा मला बोलावतो' सांगत तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 03:00 PM2018-10-16T15:00:58+5:302018-10-16T15:18:51+5:30
नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर - नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ यशवंत नागपूरकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू पाहिल्यानंतर तणाव असह्य झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं सौरभने म्हटलं आहे.
सौरभ हा प्रियदर्शिनी भगवती महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील यशवंत हे एनसीसीमध्ये अधिकारी असून त्याला एक बहीणही आहे. आईवडील घरी नसताना सौरभने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभने त्याच्या सुसाईड नोटमध्ये काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्या घटनेपासून चिमुकल्याचा आत्मा मला बोलावतो. त्यामुळेच त्याला भेटण्यासाठी जात असल्याचं कारण त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे मुलाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सौरभच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.