नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 09:55 PM2019-06-01T21:55:33+5:302019-06-01T21:59:38+5:30
उपराजधानीत शनिवारी दुपारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हाहाकार माजविला. या पावसामुळे काही वेळेपुरते जनजीवन ठप्प झाले. वादळामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरील झाडे कोसळली तर विजेचे खांब तुटून पडले. परिणामी हजारो लोकांना विजेचा फटका बसला. मात्र, ४६ अंशावर गेलेल्या तापमानापासून दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत शनिवारी दुपारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हाहाकार माजविला. या पावसामुळे काही वेळेपुरते जनजीवन ठप्प झाले. वादळामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरील झाडे कोसळली तर विजेचे खांब तुटून पडले. परिणामी हजारो लोकांना विजेचा फटका बसला. मात्र, ४६ अंशावर गेलेल्या तापमानापासून दिलासा मिळाला.
शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमरास अचानक जोरदार वादळ आले. वारा ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहू लागला. त्यामुळे सर्वत्र धूळ उडत असल्याने कुणालाही काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना काही क्षण आपली वाहने थांबवावी लागली. लगेचच जोरदार पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. वादळी हवेमुळे जाटतरोडी चौकातील विजेचा खांब रस्त्यावर तुटून पडला. छापरूनगर सोसायटी नंबर दोन येथे रस्त्याच्या बाजूला असलेले एक मोठे झाड कोसळून पडले. या दोन्ही वेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने कुठलही जीवितहानी झाली नाही. शहरातील अनेक भागांमध्ये असेच चित्र होते. त्यासोबतच हिवरीनगर, अंबाझरीपासून तर शहरातील बहुतेक सर्वच भागातील वीज गेली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
पारडीत भिंत पडून महिला जखमी
पारडीतील भवानीनगर येथे मुन्ना कुंवर नावाचा युवक राहतो. त्याचे घराचे छत टिनाचे आहे. त्याच्या शेजारीच घराचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या वादळात बाजूच्याच्या घराची भिंत त्याच्या टिनाच्या शेडवर पडली. त्यामुळे घरात असलेली मुन्नाची आई जखमी झाली.