उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 07:32 PM2018-02-06T19:32:03+5:302018-02-06T19:36:13+5:30

उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १ ‘मिलियन’ म्हणजेच १० लाखांचा टप्पा ओलांडला.

'Hawai journey of subcapital expedition: Passage of 'million' crossed the passengers | उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा

उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा

Next
ठळक मुद्देनागपूर विमानतळावरील गर्दी वाढतेय : ‘एमआयएल’ला ५५ कोटींहून अधिकचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १ ‘मिलियन’ म्हणजेच १० लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झाले. या वर्षात ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) ५५ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नागपूर विमानतळावरून किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत नागपूर विमानतळावरून १० लाख ४७ हजार १६१ प्रवाशांनी उड्डाण केले, तर १० लाख १४ हजार १८८ प्रवासी शहरात आले. सरासरी दररोज २ हजार ८६८ प्रवाशांनी शहरातून उड्डाण भरले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शहराबाहेर जाणारे व शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या १० लाखांच्या पार गेली आहे. २०१६ मध्ये ९ लाख ३१ हजार ५२३ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून उड्डाण भरले होते.
दिवसाला सरासरी २४ विमानांचे ‘लॅन्डिंग’
२०१७ मध्ये ७ हजार ५९७ ‘शेड्यूल्ड फ्लाईट्स’ व १ हजार ३०६ ‘नॉन शेड्यूल्ड फ्लाईट्स’ नागपूर विमानतळावर उतरली, तर त्याच संख्येत विमाने व हेलिकॉप्टर्स उडाली. जर आकडेवारीचा हिशेब केला तर सरासरी दिवसाला २४ विमानांनी नागपूर विमानतळावर ‘लॅन्डिंग’ केले.
महसुलात झाली वाढ
वर्षभरात विमानांच्या दळणवळणातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ३५ कोटी ८१ लाख ६७ हजार २४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा महसूल प्रामुख्याने ‘लॅन्डिंग’, ‘पार्किंग’, ‘पीएसएफ’ (पॅसेंजर सर्व्हिस फी) आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळाला. विमानांच्या ‘लॅन्डिंग’पासून ११ कोटी ७६ लाख ८१ हजार ३० रुपयांचा महसूल प्राप्त झाला, तर ‘पीएसएफ’अंतर्गत २२ कोटी ११ लाख ४२ हजार ५५२ रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षी महसुलाचा हाच आकडा ३१ कोटी २४ लाख ८९ हजार ६९९ इतका होता. याशिवाय २०१७ मध्ये विमानतळाच्या आत व बाहेर ‘कमर्शियल’ उपक्रमांसाठी ‘एमआयएल’ला १२ कोटी ४९ लाख ६६ हजार ५६२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ‘एमआयएल’ला वर्षभरात एकूण ५५ कोटी १२ लाख १६ हजार ६५७ रुपयांचा महसूल मिळाला.
वर्षभरात तेराशेहून अधिक खासगी विमानांचे ‘लॅन्डिंग’
वर्षभरात विमानतळावर ‘लॅन्डिंग’ झालेल्यांपैकी १४.६६ टक्के विमाने व ‘हेलिकॉप्टर्स’ खासगी होते. २०१७ या वर्षभरात नागपूर विमानतळावर १ हजार ३०६ खासगी विमाने व ‘हेलिकॉप्टर्स’चे ‘लॅन्डिंग’ झाले. त्यांच्यापासून ५७ लाख ०६ हजार ३०८ इतका महसूल प्राप्त झाला.

Web Title: 'Hawai journey of subcapital expedition: Passage of 'million' crossed the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.