बुटीबोरी न.प.ला हवाय विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:57+5:302021-09-02T04:16:57+5:30

बुटीबोरी : बुटीबोरी ग्रामपंचायतला २०१८ मध्ये नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्या वेळच्या युती सरकारने बुटीबोरीच्या विकासाकरिता १० कोटी रुपयांची निधी ...

Hawaii Development Fund to Butibori NP | बुटीबोरी न.प.ला हवाय विकास निधी

बुटीबोरी न.प.ला हवाय विकास निधी

Next

बुटीबोरी : बुटीबोरी ग्रामपंचायतला २०१८ मध्ये नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्या वेळच्या युती सरकारने बुटीबोरीच्या विकासाकरिता १० कोटी रुपयांची निधी दोन टप्प्यांत मंजूर केला होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. बुटीबोरी शहर हे औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जाते. आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध सोईसुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषदेला करआकारणी वरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे बुटीबोरीत नागरी सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, गत दोन वर्षांत शहराच्या विकासासाठी सरकारने कोणत्याही स्वरूपाची मदत केली नसल्याचा आरोप बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केला आहे. शहराच्या विकासाठी सरकारने ५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, याकडे गौतम यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधले आहे.

300821\5620img_20210830_144207.jpg

नगराध्यक्ष राजेश (बबलू) गौतम

Web Title: Hawaii Development Fund to Butibori NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.