उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : वर्षभरात प्रवासी संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:17 PM2019-02-05T22:17:46+5:302019-02-05T22:21:05+5:30

उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१८ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १३ लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झालेत. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये आगमन झालेल्या व उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ३० टक्क्यांनी वाढ झाली. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

'Hawaii' progress of subcapital accelerated : 30% increase in passenger traffic during the year | उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : वर्षभरात प्रवासी संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : वर्षभरात प्रवासी संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउड्डाण करणाऱ्या प्रवाशांचा टप्पा १३ लाखांच्या पार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१८ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १३ लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झालेत. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये आगमन झालेल्या व उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ३० टक्क्यांनी वाढ झाली. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. २०१८ मध्ये नागपूर विमानतळावरुन किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विमानतळावरुन १३ लाख ३७ हजार ८४० प्रवाशांनी उड्डाण केले. तर १३ लाख ३४ हजार १८० प्रवासी शहरात आले. सरासरी दररोज ३ हजार ६६५ प्रवाशांनी शहरातून उड्डाण भरले. २०१६ मध्ये ९ लाख ३१ हजार ५२३ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरुन उड्डाण भरले होते.
१२०० हून अधिक खासगी विमानांचे ‘लॅन्डिंग’
२०१८ मध्ये विमानतळावर १ हजार २४६ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरली. यातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ४४ लाख २३ हजार ८५९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
महसुलातदेखील झाली वाढ
वर्षभरात विमानांच्या दळणवळणातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ४४ कोटी ८६ लाख ६० हजार ७३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा महसूल प्रामुख्याने ‘लॅन्डिंग’, ‘पार्किंग’, ‘पीएसएफ’ (पॅसेंजर सर्व्हिस फी) आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळाला. विमानांच्या ‘लॅन्डिंग’पासून २५ कोटी ९ लाख २२ हजार ४८४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला तर ‘पीएसएफ’अंतर्गत १७ कोटी ३६ लाख ८२ हजार ७३३ रुपयांचा महसूल मिळाला. २०१७ मध्ये या माध्यमातून मिळालेल्या महसूलाचा आकडा ३५ कोटी ८१ लाख ६७ हजार २४ इतका होता. २०१८ मध्ये महसूलात ९ कोटी ४ लाख ८३ हजार ४९ रुपये म्हणजेच २५ टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला एकूण १२० कोटी ४ लाख ११ हजार ५६९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला व यातील ९३ कोटी ७० लाख २४ हजार ३१३ रुपये खर्च झाले.

 

Web Title: 'Hawaii' progress of subcapital accelerated : 30% increase in passenger traffic during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.