एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर इन्स्टिट्युटने साजरा केला चौथा वर्धापनदिन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:41+5:302021-06-09T04:08:41+5:30
नागपूर : एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या वतीने नुकताच अभिनव पद्धतीने चौथा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी नॅशनल कॅन्सर सर्व्हाइव्हर्स ...
नागपूर : एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या वतीने नुकताच अभिनव पद्धतीने चौथा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी नॅशनल कॅन्सर सर्व्हाइव्हर्स डे सुद्धा साजरा करण्यात आला. कोरोनामुळे हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर सर्व्हाईव्हर्ससाठी दोन ऑनलाईन कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आल्या. यात कॅन्सर वॉरियर्सला एक असे झाड तयार करण्यास सांगितले ज्याचा बुंधा आणि त्याच्या शाखा आणि पाने यांची देखभाल करणाऱ्याच्या रूपाने दाखवायची होती. याशिवाय त्यांना एका मिनिटाचा व्हिडीओ तयार करून त्यात कॅन्सरवर मात देण्याची आपली विजययात्रा आणि महामारीपासून बचावासाठी बाळगलेली सावधानता याबाबत सांगायचे होते. या कॉन्टेस्टमध्ये ५० कॅन्सरचे रुग्ण आणि सर्व्हाईव्हर्सने सहभाग घेतला. त्यांना आर्ट किट हॉस्पिटलतर्फे पुरविण्यात आली. रुग्णांनी सांगितले की, या रचनात्मक घडामोडीचा त्यांनी खूप आनंद घेतला आणि ते तणावमुक्त झाले. शेवटी पुरस्कार वितरण समारंभासोबत हॉस्पिटलचा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी संचालक व ऑन्कोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय मेहता, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वेंकटेशवरलू मारपका, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वैभव सोनवानी व डॉ. आशिष भांगे आणि हिमेटो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निषाद धकाते, पॅथालॉजिस्ट डॉ. मंजित राजपूत व रेडिओलॉजिस्ट डॉ. नीलेश हरण यांनी दोन्ही कॉन्टेस्टच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी डॉ. अजय मेहता यांनी एचसीजी एनसीएचआरआयच्या चार वर्षाच्या यशस्वी कामगिरीवर प्रकाश टाकला. वेंकटेशवरलू मारपका यांनी विजेते आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन आऊटस्टँडिंग एम्प्लॉईज ऑफ दि इयरच्या पुरस्काराने कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. प्रास्ताविक डॉ. सुचित्रा मेहता यांनी केले. सादरीकरण डॉ. अंजली जोशी यांनी केले. संचालन कॅन्सर काैन्सिलर डॉ. कमलजित रांधे आणि आभारप्रदर्शन पेशंट को-ऑर्डिनेटर कल्पना सोनुले यांनी केले.
...............