वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:34 PM2020-05-11T21:34:04+5:302020-05-11T21:35:45+5:30

वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली.

He gave his life to relieve the pain | वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला

वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला

Next
ठळक मुद्देमानकापुरातील असहाय तरुणाची आत्महत्या : परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अक्रम खान इज्राइल खान (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर झोपडपट्टी (गल्ली नंबर ७) मध्ये राहत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्रमला आई-वडील नाही. तो त्याची वृद्ध आजी असे दोघे जण स्वत:च्या घरात राहत होते. काही महिन्यापूर्वी त्याला अपघात झाला. अपघातात दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. त्यावर त्याने घरातील होते नव्हते ते सगळे खर्ची घालून उपचार केले. मात्र त्याच्या पायातील वेदना थांबत नव्हत्या. तो अनेकदा अक्षरश: वेदनांनी ओरडायचा आणि जवळ आलेल्या प्रत्येकाला या वेदना सहन होत नाही, असे सांगायचा. अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने त्याची वृद्ध आजी काही दिवसापूर्वी आर्वी येथील नातेवाईकाकडे गेली. त्याच्या घरात भाड्याने राहणारे त्याला दोन वेळेचे जेवण आणि चहा देत होते. भूक भागायची मात्र त्याच्या वेदना काही थांबत नव्हत्या. त्यामुळे त्याने सोमवारी दुपारी २ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

 

Web Title: He gave his life to relieve the pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.