३१ व्या वर्षी गुन्हा करून फरार झालेला गुन्हेगार तब्बल ३२ वर्षांनंतर लागला हाती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 08:31 PM2022-02-14T20:31:24+5:302022-02-14T20:32:45+5:30
Nagpur News ३२ वर्षांपासून फरार असलेल्या आणि आपल्या राहण्याचे ठिकाण वारंवार बदलवून चकमा देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर गजाआड केले आहे.
नागपूर : ३२ वर्षांपासून फरार असलेल्या आणि आपल्या राहण्याचे ठिकाण वारंवार बदलवून चकमा देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर गजाआड केले आहे. १९८९ मध्ये त्याने एका मुलीला फूस लाऊन पळविले होते. तेंव्हा तो ३१ वर्षांचा होता. आता अटक करण्यात आली तेव्हा तो ६४ वर्षांचा झाला आहे, हे विशेष !
गुलाब खान जुल्फू खान (६४, डोबीनगर, नागपूर) ह. मु. कल्याणवाडी, सोनटक्के प्लॉट जुने शहर अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतवारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात १९८९ मध्ये त्याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३६६, ३५४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून हा आरोपी फरार होता. तो वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना चकमा देत होता. अखेर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी हवालदार रवींद्र सावजी, राजेश पाली, रोशन अली यांनी चमू गठित केला. चमूने आपले कसब पणाला लाऊन आरोपीस अकोला येथून अटक केली.
..................