किस्त भरतो सांगून मित्राची कार विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:29+5:302021-09-05T04:13:29+5:30
वासु मुळे (४०) रा. महाजनवाडी असे आरोपीचे नाव आहे. माधवराव ताराचंद्र भुरे (४४), रा. राजीवनगर, वाघधरा असे कार देणाऱ्या ...
वासु मुळे (४०) रा. महाजनवाडी असे आरोपीचे नाव आहे. माधवराव ताराचंद्र भुरे (४४), रा. राजीवनगर, वाघधरा असे कार देणाऱ्या फिर्यादीचे नाव आहे. भुरे यांनी शोरुममध्ये १.१० लाख रुपये डाऊन पेमेंट भरून महिंद्रा फायनान्स कंपनीकडून २.६५ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यांनी कार क्रमांक एम. एच. ४०, बी. जे-१६५५ च्या जवळपास ३३ किस्त भरल्या होत्या. परंतु कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे त्यांना किस्त भरणे अवघड झाले होते. त्यामुळे भुरे यांचा मित्र वासु मुळे याने ११ हजार रुपये देऊन पुढील किस्त भरण्याचे आश्वासन दिले होते. तो भुरे यांची कार आपल्या घरी घेऊन गेला. परंतु त्याने कारच्या कर्जाची एकही किस्त फायनान्स कंपनीला दिली नाही. दरम्यान आरोपी वासूने कार दुसऱ्या व्यक्तीला विकली. फायनान्स कंपनीने सूचना दिल्यानंतर भुरे यांना किस्त भरल्या गेली नसल्याचे समजले. त्यानंतर भुरे यांनी वासूला आपली कार परत मागितली. परंतु आरोपी वासूने कार विकली होती. त्यामुळे भुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.