बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:52+5:302021-07-08T04:06:52+5:30

नागपूर : बसस्थानकावर गेल्यानंतर अनेकदा बसची वाट पाहत थांबावे लागते. बाहेरगावावरून येणाऱ्या बसला किती वेळ आहे हे समजू शकत ...

He stopped at the bus stand | बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले

Next

नागपूर : बसस्थानकावर गेल्यानंतर अनेकदा बसची वाट पाहत थांबावे लागते. बाहेरगावावरून येणाऱ्या बसला किती वेळ आहे हे समजू शकत नाही. परंतु ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’ (व्हीटीएस)मुळे आता बसचे लाईव्ह लोकेशन कळत असून प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसण्याची गरज नाही.

गाडीचा स्पीड अन् लाईव्ह लोकेशनची माहिती

व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीममध्ये एसटीच्या बसमध्ये एक डिव्हाईस लावण्यात आली आहे. ही डिव्हाईस मुंबई कार्यालयातील मेन सर्व्हरला जोडलेली आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांना गाडीचा स्पीड कळतो. तसेच प्रवाशांना नेमकी बस कुठे आहे याची माहिती कळते. चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यास त्याची माहितीही एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळते. तसेच चालकाने गाडी बायपासने नेली की नाही हे सुद्धा समजण्याची व्यवस्था व्हीटीएस सिस्टीममध्ये आहे. त्यामुळे व्हीटीएस सिस्टीम एसटीचे अधिकारी आणि प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे.

बसस्थानकावर लागले मोठे स्क्रीन

बस नेमकी कोठे आहे हे प्रवाशांना समजण्यासाठी बसस्थानकावर मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. गाडीला किती वेळ आहे याची माहिती या स्क्रीनच्या माध्यमातून प्रवाशांना होते. त्यामुळे प्रवाशांना बसची चौकशी करण्यासाठी चौकशी कक्षात जाण्याची गरज नाही. व्हीटीएस सिस्टीममुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चालकांच्या निष्काळजीपणाला चाप

अनेकदा चालक कुठेही बस थांबवतात. त्यामुळे बसमधील प्रवाशांना त्याचा मन:स्ताप होतो. व्हीटीएस सिस्टीमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे. बरेचदा चालक चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करीत असल्यामुळे अपघाताची शक्यता असते. परंतु व्हीटीएस सिस्टीममुळे चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यास त्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे चालकांच्या निष्काळजीपणाला चाप बसला असून बसची वेळ पाळणेही शक्य झाले आहे.

तक्रारीवर त्वरित कारवाई

अनेकदा एसटी बसचे चालक वेगाने गाडी चालवतात. चुकीच्या पद्धतीने बस ओव्हरटेक केल्यामुळे अपघाताची शक्यता राहते. याबाबत एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्या तक्रारीवर व्हीटीएस सिस्टीममुळे त्वरित कारवाई करणे शक्य झाले आहे. व्हीटीएस सिस्टीममुळे संबंधित चालकाने बस कशी चालवली याची माहिती मिळत असल्यामुळे चालकांवरही दबाव निर्माण झाला आहे.

ब्रेकडाऊन झाल्यास त्वरित दुरुस्ती

अनेकदा एसटी बस प्रवासात असताना नादुरुस्त होते. व्हीटीएस सिस्टीममुळे बस नादुरुस्त झाल्यास त्याची त्वरित अधिकाऱ्यांना माहिती होते. त्यामुळे बसची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्यात येते. नागपूर विभागातील ४५० बसेसमध्ये व्हीटीएस सिस्टीम लावण्यात आली असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

व्हीटीएस सिस्टीममुळे प्रवाशांना दिलासा

‘व्हीटीएस सिस्टीममुळे बसचे नेमके लोकेशन प्रवाशांना कळत असल्यामुळे त्यांना बसस्थानकावर ताटकळत बसण्याची गरज उरली नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनाही बसची संपूर्ण माहिती मिळत असल्यामुळे बसच्या चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.’

-निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

.................

Web Title: He stopped at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.