आग लागली पळ! दीड दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन पळत सुटली सीझर झालेली माय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:46+5:302021-01-10T04:07:46+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. घटना घडलेल्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला लागूनच असलेल्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्डातील मातांना रातोरात नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात स्थानांतरित केले. परंतु या घटेनचा थरकाप अजूनही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

He took the one and a half day old baby in his arms and ran away | आग लागली पळ! दीड दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन पळत सुटली सीझर झालेली माय...

आग लागली पळ! दीड दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन पळत सुटली सीझर झालेली माय...

Next

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रसूती वॉर्डात दोन दिवसाच्या चिमुकल्याला कुशीत घेऊन झोपले होते. सीझर झाल्याने अर्धवट शुद्धीवरच होते. रात्री अचानक आरडाओरडमुळे दचकून उठले. सर्वत्र पळापळ सुरू होती. याचवेळी एक परिचारिका जवळ आली. रुग्णालयाला आग लागली, बाळाला घेऊन पळ, एवढेच ती म्हणाली. बाळाला कुशीत घेतले आणि पळत सुटले. पहिल्या मजल्यावरून खाली येताना बाळाला सांभाळत एकमेकाच्या अंगावर पडत खाली आले. नातेवाईकांचा शोध घेतला. ते भेटताच रडू कोसळले. आताही अंग थरथर कापत आहे.

या घटनेचे साक्षीदार असलेल्या एका मातेला बोलते केले असता तिने आपली आपबिती सांगितली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. घटना घडलेल्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला लागूनच असलेल्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्डातील मातांना रातोरात नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात स्थानांतरित केले. परंतु या घटेनचा थरकाप अजूनही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

यातीलच एक शहापूर येथील कवडशी गावातील रंजना बोदमकर या मातेला बोलते केले. त्या म्हणाल्या, जळालेल्या वॉर्डाच्या बाजूलाच आमचा वॉर्ड होता. जवळपास ३० माता आपल्या चिमुकल्यांसोबत गाढ झोपेत होत्या. रात्री २ वाजताच्या सुमारास काही जळाल्याच्या वासाने आणि आरडाओरडमुळे झोप उडाली. याचवेळी एक परिचारिका जवळ आली. तिने मला हलवीत, आग लागली पळ म्हणून समोर निघून गेली. वॉर्डात सर्वच जण आपल्या बालकांना घेऊन पळत सुटले होते. सीझर झालेल्या ज्या मातांना उठता येत नव्हते त्यांना परिचारिका स्ट्रेचरवर बसवून, तर काहींना व्हीलचेअरवर बसवून घेऊन जात होते. एकेका स्ट्रेचरवर दोन-तीन माता बसून जात होत्या. माझेही सीझर झाले होते. सोबत बहीण होती. परंतु ती कुठे दिसून येत नव्हती. यामुळे संपूर्ण शक्ती एकवटून दीड दिवसाच्या बाळाला घेऊन कशीबशी उभी झाली. हाताला जे लागेल त्याचा आधार घेत चालायला लागली. पहिल्या मजल्यावरून खाली येताना पायऱ्यांवर गर्दी झाली होती. सर्वच जण एकमेकांना ढकलत, अंगावर पडत खाली उतरत होते. तो अंधूक अंधारही भयाण वाटत होता. बाळाला घट्ट छातीशी पकडले आणि गर्दीत शिरले. त्याचवेळी मागून कुणीतरी धक्का दिला. खाली पडले. बाळ रडायला लागले. त्याला पाहताही येत नव्हते. कशीबशी खाली उतरली. बाहेरही पळापळ सुरू होती. त्याचवेळी मागून बहिणीने हाक दिली. आम्ही दोघी तिथेच बसून रडायला लागलो. १५ मिनिटांचा तो प्रसंग थरकाप उडविणारा होता, असे सांगत त्या मातेने बहिणीकडे असलेल्या चिमुकल्याला आपल्याकडे घेत पदराखाली घेतले.

Web Title: He took the one and a half day old baby in his arms and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.