तो बचावला, उध्वस्त होता होता...!

By admin | Published: March 9, 2017 10:23 PM2017-03-09T22:23:58+5:302017-03-09T22:23:58+5:30

यशोधरानगरात राहणारी, वडिल नसलेली १६ वर्षीय मुलगी पोलीस ठाण्यात पोहचली. नेहमी घरी येणा-या आपल्या बापाच्या वयाच्या आरोपीने

He was saved, was wasted ...! | तो बचावला, उध्वस्त होता होता...!

तो बचावला, उध्वस्त होता होता...!

Next

 नरेश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 -   यशोधरानगरात राहणारी, वडिल नसलेली १६ वर्षीय मुलगी पोलीस ठाण्यात पोहचली. नेहमी घरी येणा-या आपल्या बापाच्या वयाच्या आरोपीने आपल्यावर मारहाण करून, बलात्कार केल्याची तिची फिर्याद होती. ती ऐकून पोलीस हादरले. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत त्यांनी लगेच आरोपीची शोधाशोध सुरू केली. त्याची गचांडी पकडून त्याला ठाण्यात आणले. बदड बदड बदडले. अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ करून धमकी देणे, बलात्कार करणे असे गंभीर आरोप असल्यामुळे आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
तिकडे आरोप असलेला व्यक्ती आपण तिला हातही लावला नाही, असे रडून-ओरडून सांगत होता. आपण निर्दोष आहो, असे म्हणत त्याचा आक्रोश सुरू होता. ती आपल्या बहिणीसारखी, मुलीसारखी आहे, असेही म्हणत होता. प्रत्येक निर्ढावलेला आरोपी असेच म्हणतो. त्यामुळे त्याच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याचा प्रश्नच नव्हता. ईकडे त्याची धुलाई तर तिकडे तिची जबानी (तोंडी माहिती) घेणे सुरू होते. घटना, तारिख, वेळ अशी सविस्तर माहिती विचारली जात होती. मुलीने ती सर्वच सांगितली. घटनेनंतर आपण इंदोरा ठाण्यात गेले. तेथे आपली कैफियत सांगितली. त्यांनी याला पकडून आणले. त्याने गुन्ह्याची कुबलीही दिली. मात्र, नंतर एक जण आला अन् त्याने पोलिसांसोबत काही तरी ह्यव्यवहारह्ण केला. त्यामुळे याला सोडून देण्यात आले, असा गंभीर आरोपीही मुलीने केला होता. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी अधिकच गंभीरपणे घेतले.
तिचे बयान झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला फैलावर घेतले. घटनेच्या वेळी तू कुठे होता, काय करीत होता, त्याबाबत विचारणा सुरू झाली. मुलीने अत्याचाराची जी वेळ सांगितली, त्यावेळी आपण बारमध्ये ह्यग्राहकांच्या सेवेतह्ण होतो. पाहिजे तर बारमालक, वेटर अन् ग्राहकालाही विचारून घ्या, त्यांनी नाही म्हटले तर फासावर टांगा, अशी गयावया तो पोलिसांकडे करीत होता. गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत टाकण्यापूर्वी त्याच्या कथनाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी गड्डीगोदाममधील तो बार गाठला. मुलीने अत्याचाराची जी वेळ सांगितली. त्याच्या खुप तासाअगोदरपासून तीन तासानंतरपर्यंत तो बारमध्ये काम करीत असल्याचे बारमधील अनेकांचे सांगणे होते. सीसीटीव्ही फुटेजमधून ते खरे असल्याचे दिसत होते. त्यामुळे मुलगी खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे महिला पोलिसांनी तिला पुन्हा विश्वासात घेऊन विचारणा सुरू केली. खोटे बोलल्यास काय परिणाम होऊ शकतो, त्याची कल्पनाही दिली. त्यानंतर ती गडबडली. तिला तक्रार द्यायला घेऊन आलेल्या दोन मित्रांचीही वेगवेगळ्या प्रकारे झाडाझडती घेण्यात आली अन् भलताच धक्कादायक प्रकार पुढे आला.
मित्राच्या सांगण्यावरून कुंभाड !
यशोधरानगरात राहणा-या या (तक्रार करणा-या ) मुलीला वडिल नाही. ज्याच्यावर मुलीने बलात्काराचा आरोप लावला होता. त्या व्यक्तीसोबत मुलीच्या आईची मैत्री आहे. त्यामुळे तो नेहमीच वेळी अवेळी मुलीच्या घरी येतो. ती त्याला काका म्हणायची खरी. मात्र, तिला त्याचे घरी येणे अजिबात सहन होत नव्हते. अनेकदा तिचा मित्र ज्या वेळी घरी यायचा. त्याचवेळी कथित काका आधीच घरी आलेला असायचा. त्यामुळे हिची मोठी कोंडी व्हायची. तिचा मित्रही चरफडायचा. त्यामुळे सलत असलेल्या  काकाचा काटा काढण्यासाठी मुलीच्या मित्राने तिला भलताच सल्ला दिला. त्यानुसार, मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने कथित काकाची वाट लावण्याचे कुंभाड रचले. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावण्यासाठी ती ठाण्यात पोहचली.
त्याला वेळेने साथ दिली !
पोलिसांकडे फिर्याद सांगताना तिने दोन मोठ्या चुका केल्या. एक म्हणजे, आपण इंदोरा पोलीस ठाण्यात गेली होती, त्यांना घटना सांगताच पोलिसांनी लगेच त्याला ठाण्यात आणले होते, असे सांगितले. नागपुरात इंदोरा पोलीस ठाणेच नाही, त्यामुळे तिने स्वत:च तिच्या बयानातून शंका उपस्थित केली. दुसरे म्हणजे, तिने घटनेची जी वेळ सांगितली, ती तिच्या कारस्थानाला उघड करणारी ठरली. त्या वेळेला (आधीपासून अन् नंतरही) तो बारमध्ये काम करीत असल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट दिसत होते. त्यामुळे तिचा खोटेपणा पुढे आला. त्याबाबत सांगताना ती म्हणाली, कथित काका वेळीअवेळी घरी येत असल्यामुळे त्याच्याबद्दली तिच्या मनात घृणा होती. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी रागाच्या भरात तिने अन् तिच्या मित्राने कुंभाड रचल्याची पोलिसांपुढे कबुली दिली. त्यांचे वय, घरची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी त्यांचे समुपदेश करून सोडून दिले. त्याला (ज्याच्या विरोधात तक्रार होती) मात्र वेळेने साथ दिल्याने तो उध्वस्त होता होता बचावला!

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला-मुलींवरील अत्याचारासंदर्भातील कायदे कठोर झाले. बलात्कार अन् विनयभंगाच्या तक्रारी कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या नोंदवून घेणारे पोलीस अ्न या घटनांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येणारे पोलीस, वकिल, डॉक्टर अन् अन्य काही मंडळीही या कायद्याचा अनेक प्रकरणात दुरूपयोग होत असल्याचे मान्य करतात. महिलांसाठी काम करणा-या अनेक समाजसेवक, मान्यवर महिलासुद्धा त्याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. नागपुरात तीन दिवसांपुर्वी असेच एक प्रकरण उजेडात आले. वारंवार घरी येणा-या एका व्यक्तीबद्दल आकस निर्माण झाल्याने एका अल्पवयीन मुलीने तिच्या मित्राच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीला कौटुंबीक आणि सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्याचचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौकसपणे चौकशी केली अन् काही तासातच अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे प्रकरण खोटे, कल्पोकल्पीत असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: He was saved, was wasted ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.