यंदा अकरावीत मागेल त्याला प्रवेश! २०४ कॉलेजमध्ये ५५,८०० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 08:00 AM2023-06-02T08:00:00+5:302023-06-02T08:00:01+5:30

Nagpur News दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू होणार आहे. प्रवेश क्षमता आणि दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता यंदा नागपुरात अकरावीत मागेल त्याला प्रवेश मिळेल.

He will ask for admission in the eleventh class this year! 55,800 seats in 204 colleges | यंदा अकरावीत मागेल त्याला प्रवेश! २०४ कॉलेजमध्ये ५५,८०० जागा

यंदा अकरावीत मागेल त्याला प्रवेश! २०४ कॉलेजमध्ये ५५,८०० जागा

googlenewsNext

जितेंद्र ढवळे

नागपूर : दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू होणार आहे. प्रवेश क्षमता आणि दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता यंदा नागपुरात अकरावीत मागेल त्याला प्रवेश मिळेल.

नागपुरात अकारावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारेच होतील. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. मात्र, प्रवेश प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेली आहे. शहरातील २०४ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे होतील. ते ५५ हजार ८०० जागांसाठी असतील. यात कला शाखेच्या ८,६६०, वाणिज्य (१६,७२०), विज्ञान (२६,५१०) तर एमसीव्हीसीच्या ३,९१० जागांचा समावेश आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नागपुरात ३२ केंद्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. यात काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय हे मुख्य केंद्र असेल. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या निकालानंतरच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. यात २० ते २४ मेदरम्यान विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ डमी फॉर्म भरण्याचा सराव करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

३२,११२ विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

नागपूर जिल्ह्यातून ५९,२३८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यात ३२,११२ शहरी तर २७,१२६ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गतवर्षी २०,८५३ जागा रिक्त

गतवर्षी अकरावीच्या ५५,८०० जागापैकी शहरात ३४,९४७ जागांवर प्रवेश झाले, तर २० हजार ८५३ जागा रिक्त राहिल्या. यात कला शाखेच्या ४,६४८, वाणिज्य (७,७०४), विज्ञान (६,१४८) तर एमसीव्हीसीच्या २३५३ जागांचा समावेश आहे.

 

- अकारावी प्रवेशासंदर्भात शहरात ३२ गाइडन्स सेंटर निश्चित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. विद्यार्थ्यांना ऑप्शन फार्म व्यवस्थित भरावा.

- भानुदास रोकडे, सहायक शिक्षण संचालक, नागपूर विभाग

Web Title: He will ask for admission in the eleventh class this year! 55,800 seats in 204 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.