हवालदाराच्या पत्नीचा खून  :  नागपुरातील नंदनवन परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 09:37 PM2020-04-04T21:37:44+5:302020-04-04T21:39:15+5:30

नंदनवन परिसरातील पोलीस हवालदाराच्या पत्नीची मुलाच्या मित्राने चाकूने गळा कापून हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

Head Constable's wife murdered: An incident in Nandanwan area of Nagpur | हवालदाराच्या पत्नीचा खून  :  नागपुरातील नंदनवन परिसरातील घटना

हवालदाराच्या पत्नीचा खून  :  नागपुरातील नंदनवन परिसरातील घटना

Next
ठळक मुद्देपॅरोलवर सुटलेल्या मुलाच्या गुंड मित्रानेच केला खून

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नंदनवन परिसरातील पोलीस हवालदाराच्या पत्नीची मुलाच्या मित्राने चाकूने गळा कापून हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव सुशीला अशोक मुळे आहे. त्यांचे पती अशोक मुळे हे गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. आरोपीचे नाव नवीन सुरेश गोटाफोडे आहे.
आरोपी गोटाफोडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मृताचा मुलगा व आरोपी हे एकाच शाळेत शिकत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री होती. मात्र आरोपी नवीन गोटाफोडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने सुशीला मुळे या मुलाला त्याची संगत सोडण्यास सांगत होत्या. नवीन गोटाफोडे याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी गोटाफोडे हा कारागृहात होता. त्याला २८ मार्च रोजी पॅरोलवर सोडण्यात आले. शुक्रवारी आरोपी गोटाफोडे हा मृतक सुशीला मुळे यांच्या घरी आला. तो त्यांच्या मुलाला आवाज देत होता. परंतु सुशीला यांनी मुलाला त्याच्यासोबत भेटू दिले नाही. शनिवारी सकाळी १०.१५ वाजता गोटाफोडे पुन्हा त्यांच्या घरी आला. सुशीला यांनी पुन्हा त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने सुशीला यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले. जखमी सुशीला यांना मुलाने तात्काळ मेडिकलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, नंदनवन पोलीस ठाण्याचे निरीक्षक सांदीपन पवार यांनी तात्काळ तीन पथकांना आरोपीच्या शोधात पाठविले आहे.

Web Title: Head Constable's wife murdered: An incident in Nandanwan area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.