मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता राखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:41+5:302021-08-27T04:12:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असावे व शाळेची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असावे व शाळेची गुणवत्ता राखावी, जेणेकरून समाजात शाळेची प्रतिष्ठा राहील, असे मत वाडी (ता. नागपूर) येथील मुख्याध्यापक मधुकर झलके यांनी व्यक्त केले.
वग (ता. कुही) येथील बालाजी पाटील हायस्कूल येथे तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे राज्य अध्यक्ष माराेती खेडीकर हाेते. प्रारंभी दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेले तालुक्यातील शिक्षक पुरुषोत्तम लेंडे, सार्वे, नानोटकर, मांढरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश नेरकर तसेच मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष गोरे आणि वग येथील नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार यांचा तालुका पत्रकार संघ व मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप गिदमारे यांनी केले. मुख्याध्यापक डाेंगरे, राम बांते, गोरे व मारोती खेडीकर यांनी विचार व्यक्त केले. यावेळी खेडीकर यांनी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात मार्गदर्शक म्हणून मनोज तितरमारे, शेषराव बाभरे, विनय गजभिये, अध्यक्ष प्रदीप गिदमारे, कार्याध्यक्ष पी. बी. राघोर्ते, उपाध्यक्ष सी. डी. खांबलकर, आर. एल. आंबुलकर, सचिव गोवर्धन तिजारे, सहसचिव चंद्रकांत भांडारकर, मधुकर राऊत, कोषाध्यक्ष सज्जन पाटील, सदस्य एन. एम. वंजारी, अडिकने, धारणे, रेहपाडे, ओमदेव ठवकर, संघटन सचिव रवींद्र बाभरे, राजेंद्र कांबळे, महिला प्रतिनिधी धम्ममित्रा वासे, मानकर, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र हिवरकर, ज्ञानेश्वर गलांडे आदींची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पी. बी. राघोर्ते यांनी केले तर आभार सज्जन पाटील यांनी मानले. सभेच्या आयाेजनासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.