मुख्याध्यापिकेची आजाराला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:20+5:302021-03-27T04:09:20+5:30
कळमेश्वर : मुख्याध्यापिकेने तिच्या आजारपणाच्या त्रासाला कंटाळून टाक्यात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर शहरात गुरुवारी (दि. २५ ...
कळमेश्वर : मुख्याध्यापिकेने तिच्या आजारपणाच्या त्रासाला कंटाळून टाक्यात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर शहरात गुरुवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
सुनीता सुनील लाड (४९, रा. कळमेश्वर) असे मृत मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्या काही वर्षांपासून अस्थमाच्या त्रासाने त्रस्त हाेत्या. त्यातच काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये काेराेना टेस्ट केली हाेती. त्या टेस्टचा बुधवारी (दि. २४ मार्च) रिपाेर्ट आला हाेता. त्यामुळे त्या चिंतित हाेत्या. याच विचारात त्यांनी घराजवळील पाण्याच्या खाेल टाक्यात उडी घेतली. त्या वेळी कुणाचेही लक्ष नसल्याने त्यांचा टाक्यात बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी त्यांचे भाऊ प्रवीण शेषराव खापरे (३८, रा. कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास कळमेश्वर पाेलीस करीत आहेत.